शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मानधनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 8:42 PM

११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) ....

ठळक मुद्देसेविका व मदतनीसांची मागणी : विस्तार अधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) यांच्या संयुक्तवतीने सोमवारी (दि.१८) येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी नंदा पारवे यांना देण्यात आले.निवेदनात, ११ सप्टेंबरपासून मानधनात वाढ करण्यात यावी, आहार दर वाढविण्यात यावा, आजारपणाची १५ दिवसांची सुटी लागू करावी, दिवाळीचा बोनस एक महिन्याच्या पगारा एवढा द्यावा, रजिस्टर अहवाल पुरविण्यात यावा यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी पारवे यांच्या मार्फत महिला-बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना पाठविण्यात आले. याप्रसंगी आयटकचे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सहसचिव सुनिता मलगाम, परेश दुरूगवार, चरणदास भावे, लता बोरकर, जयकुवर मच्छीरके, सुशिला फुंडे, सुमित्रा रंगारी, माया उके, सुनिता मडावी, मनिषा डिब्बे, लक्ष्मी मरसकोल्हे, सुशिला मेंढे, रत्नमाला बडगाये यांच्यासह मोठ्या संख्येत सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.तिरोडा : तिरोडा येथे रहांगडाले यांच्या नेतृत्वात निवेदन देताना शकुंतला फटींग, परेश दुरूगवार, ब्रिजुला तिडके, जिवनकला वैद्य, दुर्गा संतापे, नंदू कावडे, निमाक्षी पटले, वंदना पटले, प्रेमलता गेडाम, सिमवता दखने, शोभा पटले यांच्यासह मोठ्या संख्येत सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.- जीआरची होळी जाळलीमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) नागरिक प्रकल्पाची सभा विठा पवार यांच्या अध्यक्षतेत कामगार भवन येथे शुक्रवारी (दि.२२) घेण्यात आली. सभेत जिल्हा अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, परेश दुरुगवार, प्रणीता रंगारी यांनी मार्गदर्शन केले. ११ सप्टेंबर पासून सुरु असलेल्या संपाबाबत माहिती दिली. राज्य शासनाद्वारे सेविका मदतनिस यांच्या मानधनवाढीवर राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा तिव्र निषेध करण्यात आला. राज्य सरकार संप मोडण्यासाठी प्रयत्नात आहे. आरोग्य विभाग मार्फत काम करण्याचा कट आहे. परंतु महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक युनियनने आशा काम करणार नाही असा निर्णय घेण्यात आला. त्याचा सभेत स्वागत करण्यात आला. दरम्यमन आंगणवाडी सेविका मदतनीस विरोधी जीआरची होळी राज्यलक्ष्मी चौकात विठा पवार यांच्या हस्ते जाळण्यात आली.