शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीजीडब्ल्यूच्या इमारतीची उंची वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:04 IST

येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीनी याची गांर्भियाने दखल घेतली.

ठळक मुद्देपाणी साचल्यानंतर घेतली दखल : लवकरच होणार कामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीनी याची गांर्भियाने दखल घेतली. रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी दोन फूट भरण भरुन इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे.जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले होते.दरम्यान या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनावर सर्वच स्तरातून टिका झाली.या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेत हा प्रकार घडण्यास नेमक्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आपल्या अहवालात बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत ८० वर्षे जुनी असून ती जीर्ण झाली आहे.रस्त्यांच्या उंचीच्या तुलनेत इमारतीची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी रुग्णालयाच्या वार्डात साचते. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीची उंची वाढविणे आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतर पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी दोन फूट भरण भरुन इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे. लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे.इतर समस्यांचे कायबीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचल्यानंतर प्रशासनाने त्याची गांर्भियाने दखल घेतली. मात्र जनरेटर, स्टोअर रुम, रूग्णालय परिसराची नियमित स्वच्छता या समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे रुग्णांचा त्रास काहीे प्रमाणात कायमच राहणार आहे. जनरेटरअभावी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र सुध्दा बरेचदा बंद असते, त्यामुळे ही समस्या देखील मार्गी लावण्याची गरज आहे.अपडाऊन सुरूचबीजीडब्ल्यू रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचारी नागपूरवरुन दररोज अपडाऊन करतात. त्याचा परिणाम येथील रुग्ण सेवेवर होत आहे. विदर्भ एक्सप्रेस येईपर्यंत रुग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा करीत बसावे लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी काहीनी तक्रारी सुध्दा केल्या मात्र रुग्णालय प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाºयांचे अपडाऊन सुरूच आहे.बीजीडब्ल्यू रुग्णालयात पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी दोन फूट भरण भरुन रुग्णालयाच्या इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल. रुग्णालयाच्या इतर समस्या सुध्दा मार्गी लावू.-व्ही.पी.रुखमोडेअधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :hospitalहॉस्पिटल