शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या वेळीच बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:47 IST

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने ....

ठळक मुद्देप्रवाशी त्रस्त : गोंदिया व तिरोडा आगाराची बस सेवा १०० टक्के बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे गोंदिया व तिरोडा हे दोनच आगार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी या आगारांतील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाºयांची बेमुदत संप पुकारल्याने दोन्ही आगारातील बससेवा १०० टक्के ठप्प पडली होती.सध्या दिवाळीचे दिवस सुरू झाले आहेत. अशात रेल्वे प्रमाणेच एसटी बसेससुद्धा भरभरून जातात. मात्र एक सणाच्या हंगामाच्या प्रसंगीत एसटीच्या कर्मचाºयांनी बेमुदत संप पुकारल्याने बस सेवाच ठप्प पडली व प्रवाशांना मोठाच मनस्ताप सहन करावा लागला.महाराष्टÑ श्रमिक संघ मान्यता व अनुसूचित कामगार प्रतिबंध कायदा १९७१ मधील कलम २४ (१) मधील तरतुदीनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्षांना संपाचे नोटीस देण्यात आले. यात १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व आगार व मध्यवर्ती कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांनी संप पुकारण्याची माहिती दिली. संप पुकारण्यापूर्वी कामगारांचे मतदान घेवून संप करण्यास बहुमत आहे किंवा नाही, हे तपासण्यात आले. यात सुमारे ८५ हजार ०५० कामगारांनी सहभाग घेतला होता. त्यात ९९ टक्के कामगारांनी सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा, या मागणीसाठी पाठिंबा दर्शविला. त्यानुसार सदर आयोग रा.प. कामगारांना लागू करावा या मागणीच्या अनुषंगाने सुधारित वेतनश्रेणी व करावयाची वेतन निश्चिती याबाबतचा प्रस्ताव महाराष्टÑ स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने २९ सप्टेंबरला पाठविला. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.जिल्ह्यातील तिरोडा आगाराची बस सेवा सोमवार (दि.१७) सकाळपासून पूर्णत: ठप्प पडलेली होती. सर्व कामगार एकत्र आले होते. यात वाहकांमध्ये खाडे, भताने, कातकरे, कुर्वे, मडारे, गीते, बोकडे, इंगळे, बारस्कर, खुणे, देशमुख; चालकांमध्ये करडे, सोनवाने, चौरे, डहाके, गणवीर, सुनील, के. शेख, आर. झगेकार, निजाम, कडव, पी. पटले, कळपाते तर यांत्रिकांमध्ये कनोजे, गजभिये, मधूकर पारधी, बोरकर, इरफान, डोंगरे, बावणथडे, पटले आदी अनेक कामगारांचा समावेश आहे.तर गोंदिया आगारातही कृती समिती संपावर असल्याने बस सेवा ठप्प पडली. यात कामगार संघटनेचे अध्यक्ष सईद शेख, सचिव आर. सोनवाने, इंटक संघटनेचे अध्यक्ष महेश तिघारे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष लियाज शेख, सचिव एस. मेश्राम, कामगार सेनेचे सचिव प्रकाश रामटेके व सदस्यांमध्ये नसीमभाई, पुरी, शाहीद, वहीद, गोसावी, एस. तिवारी, शरीफ खान, टी.सी. पाथोडे, चौरसिया, रामटेके, पाठक, सादीक, यादव, चंद्रिकापुरे, किशोर नेवारे, डोये, स्वाती टेंभुर्णे, पौर्णिमा टेंभुर्णे, आर. पटले, शुभांगी, बबली रूद्रकार, हटवार, वर्षा, केवल नेवसे, जावेद, हापीज पठान आदी अनेक कर्मचाºयांचा समावेश आहे.