शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हेल्थ वेलनेस योजनेत गोंदिया तालुक्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:03 IST

केंद्र शासनाने गुरूवारी (दि.२८) गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष बीएएमएस (आयुवैदिक) डॉक्टर व अतिरिकक्त परिचर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश : ५६ आरोग्य उपकेंद्रांमध्ये विशेष डॉक्टर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र शासनाने गुरूवारी (दि.२८) गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष बीएएमएस (आयुवैदिक) डॉक्टर व अतिरिकक्त परिचर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे केवळ गोंदिया तालुक्याचाच या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. योजना लागू झाल्यामुळे वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच कॅन्सर पीडितांना नियमित औषधी या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांचा मागील वर्षापासून हेल्थ वेलनेस स्कीम अंतर्गत समावेश करण्यात आला होता. तेथील सर्व आरोग्य उपकेंद्रांवर बीएएमएस डॉक्टराच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु गोंदिया जिल्ह्याला या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले होते. या संदर्भात आ. अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार करुन गोंदिया तालुक्याला हेल्थ वेलनेस स्कीम अंतर्गत सहभागी करण्याच्या शिफारशीसह प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. केंद्र शासनाच्या स्तरावर शेवटी गोंदिया तालुक्याचा या योजनेत समावेश झाला. गोंदिया तालुक्याचा हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समावेश करून दिल्याबद्दल जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जि.प. सभापती रमेश अंबुले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, जि.प. सभापती विमल नागपुरे, पी.जी. कटरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे आदींनी आ. अग्रवाल यांचे आभार मानले.

टॅग्स :Healthआरोग्यGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल