शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन

By admin | Updated: November 19, 2016 00:39 IST

आपला दैनंदिन जीवनमान बदलवून सुसंस्कृत वातावरणाशी समरस होवून गुण्यागोविंदाने कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परंपरागत धानाच्या शेतीला बगल देणे गरजेचे आहे.

कृषी अधिकारी तुमडाम: महिलांनी प्रक्रिया उद्योग करावेबोंडगावदेवी : आपला दैनंदिन जीवनमान बदलवून सुसंस्कृत वातावरणाशी समरस होवून गुण्यागोविंदाने कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परंपरागत धानाच्या शेतीला बगल देणे गरजेचे आहे. उत्पादित शेती मालावर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी महिला शेतकऱ्यांनी नि:संकोचपणे पुढे येवून व्यवसाय करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.तालुक्यातील ईळदा या आदिवासी गावातील आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन करून नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प संचालक आत्मा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ईळदा येथे आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, आत्मा गोंदियाचे उपप्रकल्प संचालक के.आर. सराफ, कृषी पणन तज्ज्ञ कुंभार, तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक व्ही.एच. कोहाडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी तुमडाम म्हणाले, आदिवासी महिलांनी व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे. आपल्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी पारंपरिक शेतीला बगल देवून निर्माण करण्यात आलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत बियाणे विक्री करणे, खत विक्री करणे, धानापासून तांदूळ बनविणे यासारखे प्रक्रिया उद्योग करणे, मिरची पावडर, हळद ईत्यादी व्यवसाय करण्यासाठी धडाडीने पुढे आल्यास निश्चितपणे आर्थिक सुबत्ता नांदेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर के.आर. सराफ यांनी मानव विकास अंतर्गत प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण, बिजोत्पादन कार्यक्रम, जैविक/सेंद्रीय शेती, बाजारामध्ये ज्या वस्तूंची मागणी आहे त्या वस्तूंचे उत्पादन घेणे, कंपनीमार्फत बँक उभारणे, कंपनीला थेट पणन परवाना, कीटकनाशके, खते विक्री परवाना उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. ईळदा येथे एकत्र येवून महिलांनी तयार केलेल्या आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे नोंदणी प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांच्या हस्ते महिला प्रवर्तकांना देण्यात आले. संचालन संगीता कोवे यांनी केले. आभार अलका मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)