शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन

By admin | Updated: March 15, 2017 01:08 IST

विद्यार्थी जीवन हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सोनेरी काळ आहे. जीवनात कायमस्वरूपी यशस्वी

बहेकार यांचा सत्कार : ३० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप सालेकसा : विद्यार्थी जीवन हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सोनेरी काळ आहे. जीवनात कायमस्वरूपी यशस्वी बनून जगायचे असेल तर विद्यार्थी काळात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ घेत संधीचे सोने केले पाहिजे, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल यांनी केले. त्या सालेकसा येथे मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या नवनिर्मित इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. इमारतीचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा वर्षाबेन पटेल, अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्या दुर्गा तिराले, प्रभाकर दोनोडे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हरिनारायण चौरसिया, नवीनभाई पटेल, विजय रगडे, सातपुते व प्राचार्य डॉ.ललीत जीवानी उपस्थित होते. वर्षा पटेल पुढे म्हणाल्या, वाढती विद्यार्थी संख्या व सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी सुविधा जवाबदारी कडे वळावे लागते. विशेष करून मुलींना घरगृहस्ती मध्ये जवाबदारी संभाळावी लागते. शिक्षण घेत असताना आपल्या क्षमतेचा व बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करून घेणे आवश्यक असते. त्यामुळे आयुष्यात अनेक आवाहने पेलण्याची धैर्य वाढते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरतभाऊ बहेकार होते. ते म्हणाले की, सालेकसा तालुका हा आदिवासी नक्षलग्रस्त व मागासलेला असून या तालुक्याचे मुली व मुले शिक्षणाच्या सोयी अभावी आपले शिक्षण अर्धवट सोडतात. २२ वर्षा पूर्वी त्यानी केलेल्या प्रयत्नामुळे प्रफुल्ल पटेल यांनी येथे पदवी महाविद्यालय सुरू करून उच्च शिक्षणाची दारे उघडून दिली. येथे विज्ञान शाखा पुन्हा सुरू करण्याचा आग्रह केला. कार्यक्रमाला पुरविण्यासाठी विस्तारीत स्वरूपात पुन्हा नवीन इमारत जोडण्यात आल्याचे म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करण्यात व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. दुर्गा तिराले, प्रभाकर दोनोडे यांनी संबोधित केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ललीत जीवानी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य हरिनारायण चौरसिया यांनी महाविद्यालयाच्या प्रगती बाबत अनेक प्रसंगाचा उलगडा केला. माजी मंत्री भरत बहेकार यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. प्राध्यापकांनी सुरू केलेली मेरिट स्कॉलरशीपचे ३० धनादेश पात्र विद्यार्थ्यांना देण्यात आले. संचालन प्रा.श्रीकांत भोवते तर आभार प्रा.गोपाल हलमारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)