शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दुर्गम जेठभावडा झाले आदर्श ग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 21:47 IST

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आयएसओ मानांकन प्राप्त गट ग्रामपंचायत जेठभावडा आता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्रामचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी याची घोषणा केली.

ठळक मुद्देग्रामपंचायतला भेट : आदर्श ग्रामचे पोपटराव पवार यांंची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आयएसओ मानांकन प्राप्त गट ग्रामपंचायत जेठभावडा आता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्रामचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी याची घोषणा केली. त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे.पोपटराव पवार यांनी बुधवारी (दि.१३) जेठभावडा ग्रामपंचायतला भेट देवून गावाची पाहणी केली. तसेच येथील लोकांशी संवाद साधला. लोकांची हिरहिरीची भूमिका पाहून ते मंत्रमुग्ध झाले. या ग्रामपंचायतची विकासाकडे होणारी वाटचाल बघून जेठभावडा ग्रा.पं.ला आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याची घोषणा ग्रामसभेत केली. प्राप्त माहितीनुसार पवार यांनी गुरुवारी (दि.१४) जेठभावडा ग्रा.पं.ला भेट देणार असल्याचे कळविले होते. मात्र त्यांनी अचानक एक दिवस आधी म्हणजे बुधवारी आपल्या चमूसह भेट देवून ग्रामपंचायत व गावाची पाहणी केली. ग्रामपंचायतने त्वरीत ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेत ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील लोकांना बोलविण्यात आले. पवार यांच्यासह कृषी संचालक तथा आदर्श गाव प्रकल्प पुणेचे निंबाळकर, देवरी तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी सहायक प्रवीण मेश्राम, धानगाये, सरपंच उमेदसिंग दुधनाग, उपसरपंच शालीनी देसाई, सदस्य ममीता धनगून, सरिता आचले, आम्रपाली साखरे, प्रिया राऊत, राजेश सलामे, खुशाल किरसान, आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित माजी सरपंच व सदस्य डॉ.जे.टी. रहांगडाले, माजी उपसरपंच व सदस्य भोजराज गावडकर व ग्रा.पं. सचिव वाय.बी. कटरे व माजी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांच्यासह गावकरी उपस्थित होते. ग्रामसभेच्या माध्यमातून पवार व त्यांच्या चमूने गावकऱ्यांशी संवाद साधला. गावातील लोकांची गावाला विकासाची तळमळ पाहुन लोकांची प्रशंसा करुन कौतुक केले. ग्रामसभेत आदर्श ग्रा.पं.करीता ठराव घेवून देवराज वडगाये यांच्या एन.जी.ओ.मार्फत आदर्श ग्राम प्रकल्पाकडे प्रस्ताव सादर केले. यावेळी पवार व त्यांच्या चमूने लोकांच्या सहभागाबद्दल सर्वांचे आभार मानले. या ग्रा.पं.ला आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव पारित केला. तसेच जेठभावडा ग्रा.पं.आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. प्रास्ताविक व संचालन माजी सरपंच व सदस्य डॉ.जे.टी. रहांगडाले यांनी केले. आभार सचिव वाय.बी. कटरे यांनी मानले.शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आदर्श ग्राम या उपक्रमाकरिता जेठभावडा ग्रा.पं.चा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावरुन या ग्रा.पं.चे मुल्यमापन करण्यासाठी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प राज्यस्तरीय समितीने १३ जून ला जेठभावडा ग्रा.पं.ला भेट देवून पाहणी केली. लोकांचा उत्साह पाहून या समितीने ग्रामसभेतच या ग्रा.पं.ला आदर्श ग्रामपंचायत म्हणून निवड झाल्याची तोंडी घोषणा केली. याबाबतचे पत्र नंतर येणार आहे.-मनोज हिरुळकर,गटविकास अधिकारी,पं.स. देवरी, जि. गोंदिया

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत