शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध येथे अशुद्ध पाणी पुरवठा

By admin | Updated: August 2, 2015 01:59 IST

येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते.

प्रश्न आरोग्याचा : डायरियासह विविध आजार जडू शकतात नवेगावबांध : येथील ग्राम पंचायतमार्फत नळ योजना चालविण्यात येत आहे. सदर योजनेला जल शुध्दीकरणाची व्यवस्था नसल्याकारणाने तलावातील पाणी सरळसरळ नळाद्वारे पुरविल्या जाते. पावसाळ्याच्या दिवसात तलावाचे पाणी गढूळ असते. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवेगावबांध येथे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीद्वारे नळ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये नवेगावबांध जलाशयाचे पाणी मोटारपंपाद्वारे गावातील पाणी टाकीमध्ये भरले जाते. तेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पुरविले जाते. वास्तविकपणे पावसाळ्याच्या दिवसात विविध ठिकाणचे पाणी तलावात वाहून येते. त्यामुळे तलावाचे पाणी गढूळ झाले आहे. त्याच पाण्याचा पुरवठा नळ योजनेद्वारे नागरिकांना केला जातो. विशेषत: पावसाळ्यामध्ये अनेक संक्रामक रोग पाण्याद्वारे पसरत असतात. अशातच पाणी जर अशुध्द येत असेल तर त्याची शक्यता अधिक असते. वास्तविकपणे नवेगावबांध जलाशयावर खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व सिरेगावबांध प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहेत. या दोन्ही योजनांद्वारे परिसरातील २२ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु या योजनांमध्ये नवेगावबांधचा समावेश करण्यात आला नाही. ज्या गावच्या तलावावर दोन-दोन पाणी पुरवठा योजनेचे पंप आहेत. त्याच गावाचा योजनेत समावेश करण्यात आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा अधिकार आहे. त्या अधिकारालाच डावलण्यात येत असल्याचे बोलले जाते. पिण्याच्या पाण्याच्या बदल्यात नागरिक पाणीपट्टी कर देखील देतात परंतु सदर पाण्याच्या शुध्दतेकडे विशेषत: लक्ष दिले जात नाही याचेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चांगल्या बाबीसाठी ग्रामपंचायतने धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु येथे देखील मतांचे राजकारण होत असल्यामुळे तसे निर्णय घेतले जात नाहीत असा अनेकांचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने आता तरी शुध्द पाण्याचा पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)