शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

बिघडलेली आरोग्य सेवा सुधारा

By admin | Updated: May 25, 2017 00:47 IST

जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे.

बीजीडब्ल्यूतील बालमृत्यूची चौकशी करा : प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात १ जूनला आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याचे शेवटच्या टोकापासून येणाऱ्या महिला प्रसूती व इतर आजाराकरीता दाखल होतात. महिलांसाठी असलेल्या या एकमेव रुग्णालयाची परिस्थिती सद्या विदारक आहे. बालमृत्यू दर हा कमी व्हावा हा शासनाचा दृष्टीकोण असला तरी या रुग्णालयात १ एप्रिल ते १३ मे २०१७ पर्यंत ३४ बालकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण बाहेर आल्याने शासन व जिल्हा प्रशासन या विषयावर किती गंभीर आहे हे स्पष्ट होते. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खा. प्रफुल पटेल यांनी केली आहे.जिल्हास्तरावर महिलांसाठी शासनाच्या वतीने चालविण्यात येणारे बाई गंगाबाई हे एकमेव महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयासारखी जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रात परिस्थिती आहे यात शंका नाही. गंगाबाईतील बालमृत्यू प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरून तातडीने चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी, मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबाला तातडीने शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे केली आहे. गंगाबाईचे बालमृत्यू प्रकरण शासनाला काळीमा फासणारे आहे. या गंभीर प्रकरणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ जूनला गोंदिया येथे धरणे आंदोलन करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचे काम करणार, अशी माहिती खा. पटेल यांनी दिली. जिल्हास्तरावरील महिलांसाठी असलेले बाई गंगाबाई रुग्णालय गोरगरीब व सामान्य माणसाचे आशा स्थान आहे. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रामधून व नागरिकांकडून महिलांना प्रसूतीसाठी व इतर आजारासाठी या रुग्णालयात दाखल केले जाते. सद्याच्या काळात या महिला रुग्णालयाची परिस्थिती विदारक असल्याचे जाणवत आहे. सद्या हे रुग्णालय जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. या रुग्णालयात तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. एकीकडे राज्य सरकार व केंद्र सरकार प्रसिध्दी माध्यमाच्या वतीने सर्वांना आरोग्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगते मात्र या रुग्णालयात दिड महिन्यात ३४ बालकांचा मृत्यू होणे ही जिल्हा प्रशासनाला, केंद्र आणि राज्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे. कुपोषण मुक्त भारत करण्याची घोषणा करणाऱ्या शासनाला याचा विसर पडला असेच म्हणावे लागेल. आरोग्य सुविधा ही आवश्यक सेवा असून ही गोंदिया जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण व्हावी ही सुध्दा शरमेची बाब आहे. ज्यांचे मूल दगावलीत त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. जिल्हा स्तरावरील रुग्णालयात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद व उपकेंद्रात काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी. जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडून पडलेली आहे असेच म्हणावे लागेल. सदर प्रकार अत्यंत धक्कादायक व मनसुन्न करणारा आहे. या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ पातळीवरुन तातडीने चौकशी करावी, दोषींवर तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी, मूल दगावली त्या परिवाराला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, शासनाने संबधितांना न्याय दिला नाही तर १ जून रोजी गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून न्याय देण्यास शासनाला भाग पाडू, असे ही प्रफुल पटेल म्हणाले.