देवरी : केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून डिझेल, पेट्रोल व घरगुती गॅसचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. या वाढत्या दरवाढीचा निषेध करीत सतत होणारी इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधानांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. याकरिता इंधन व गॅसच्या किमती कमी करण्यात याव्यात. पेट्रोल, डिझेलची दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेशकुमार देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष योगेश बिसेन, शहर अध्यक्ष मुकेश खरोले, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष हिमांशू ताराम, महासचिव सुजीत अग्रवाल, अंकुश परतेकी, हेमंत ताराम, रामेश्वर परतेकी, सारंग देशपांडे, अजय कुंभरे, सुरेश ताराम, माणिकचंद कोरेटी, अंकित मडावी, दुर्गेश मडावी, रोशन परिहार, राजेश बिंझलेकर, मुन्ना झिंगरे, महेंद्र निकोडे यांचा समावेश होता.