लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. जिल्ह्यातील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेऊन नुकसानीचे त्वरीत पंचनामे सुरू करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या अधिनस्त येणाऱ्या यंत्रणेला द्यावे असे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी म्हटले आहे.आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी आणि मळणी करुन विक्री करुन दिवाळी साजरी करतात. मात्र दिवाळीपूर्वीच अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा कापणी केलेला धानाला सर्वाधिक फटका बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पाखड झाले तर काही प्रमाणात सडले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावले आहे.अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्याचा दौऱ्या दरम्यान अनेक शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. या दरम्यान अवकाळीमुळे धानपिकाचे मोठे नुकान झाल्याची बाब पुढे आली. शेतकऱ्यांनी सुध्दा आपल्या व्यथा मांडल्या.त्यामुळे प्रशासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. असे पत्र सुध्दा चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह उद्धव मेंहदळे, इंद्रदास झिलपे, सुभाष देशमुख, चेतन शेंडे, यादोराव भावे, पंढरी वकेकार, तुकाराम मडावी, सर्वेश धांडे, मोरेश्वर भावे, विलास भावे, देवराव रोकडे, सचिन लांजेवार, गोपीचंद कावळे, संतोष कुळमेथे, महादेव शहारे, गोपाल अवराशे उपस्थित होते.
धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST
आठवडाभरापूर्वी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका धानपिकांना बसला. पावसामुळे धानाचे पीक भूईसपाट झाले तर धान पाखड झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे.
धानपिकाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावावी