लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : शहरातील अतिक्रमणधारकांना त्वरीत पट्टे वाटप करण्यात यावे. अशी मागणी आ.विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा सभेत केली.नगर परिषद तिरोडा हद्दीतील महात्मा फुले वॉर्डातील मागील ५० वर्षापासून अतिक्रमण करीत असलेल्या अतिक्रमणधारकांना तात्काळ पट्टे वाटप करण्यात यावे अशी मागणी रहांगडाले यांनी केले. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या क-वर्ग पोंगेझरा येथे प्राचीन काळापासून महाशिवरात्रीला यात्रा भरते. दरवर्षी येथे पाच हजाराहून अधिक भाविक भेट देतात. मात्र या ठिकाणी अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. त्याकरिता सिमेंट रस्ता, शुद्ध पिण्याचे पाणी, स्नानगृह, शौचालय तयार करणे आवश्यक असून जिल्हा पर्यटन निधीतून सदर रस्ता तयार करण्याची मागणी करण्यात आली.पोंगेझरा तीर्थक्षेत्र महाशिवरात्रीच्या कालावधीत तीन दिवस सर्व यात्रेकरुसाठी खुला ठेवण्यात यावा. याबाबत वन्यजीव विभाग व वनविभाग यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तिरोडा तालुक्यातील मागील वीस वर्षापासून बेरडीपार (काचेवानी) येथील शेतकºयांनी लोहझरी तलावाकरिता आपल्या जमीन अधिगृहीत केलेल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा तलाव तयार करण्यात आला नाही. परंतु अद्यापही शेतकºयांच्या सात बाºयावर तलावाकरिता अधिगृहीत असे लिहून येत असल्यामुळे शेतकºयांना जमीन खरेदी-विक्री करण्यात अडचण निर्माण होत आहे. तलाव अधिग्रहण नोंद कमी करण्याची कारवाही करण्याची मागणी केली. तिरोडा पोलीस स्टेशन इमारत व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकरिता शासनाने २ कोटी ६१ लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली आहे. परंतू अद्यापही बांधकाम बांधकाम करण्यात आले नाही. त्यावर गृह विभागाने शासनाकडे पाठपुरावा करुन इमारत बांधकामाला सुरू करण्यात यावे. आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीला जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, वनविभागाचे शेंडे, उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, मुख्याधिकारी विजय देशमुख, पोलीस निरीक्षक कैलाश गवते, पोंगेझरा तीर्थक्षेत्र संस्था सचिव जागेश्वर सूर्यवंशी, सदस्य सुरेंद्र बिसेन उपस्थित होते.
अतिक्रमणधारकांना त्वरित पट्टे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:15 IST
शहरातील अतिक्रमणधारकांना त्वरीत पट्टे वाटप करण्यात यावे. अशी मागणी आ.विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा सभेत केली.
अतिक्रमणधारकांना त्वरित पट्टे द्या
ठळक मुद्देविजय रहांगडाले : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा सभा