शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबवा

By admin | Updated: August 22, 2016 00:20 IST

गावांना शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.

पालकमंत्री बडोले : जिल्हा अंमलबजावणी समितीची बैठकगोंदिया : गावांना शांततेकडून समृध्दीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. तंटामुक्त गाव समित्यांनी यासाठी निश्चित कौतुकास्पद काम केले आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी तंटामुक्त समित्यांना प्रशिक्षण देऊन एक गाव एक गणपती बरोबर विविध उपक्रम राबवावे असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठकीत ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, सदस्य सचिव तथा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महीरे, उपविभागीय पोलीस अधिकारी देविदास इलमकर, दिपाली खन्ना, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राधेशाम शर्मा यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या गाव पातळीवरील समित्यांचे गठण शासन निर्णयानुसार करण्यात यावे. समितीच्या माध्यमातून एक गाव एक गणपती स्थापन करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करावे. हया समित्या गठण करतांना योग्य व्यक्तीची निवड करावी. समितीचे कार्य प्रभावीपणे करण्यासाठी पोलीस पाटील, समितीचे सचिव, पोलीस कर्मचारी-अधिकारी यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात यावे, प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत दारुबंदी झालेल्या गावांची, गुन्हे घडणाऱ््या गावांची यादी तयार करावीे, ज्या गावामधून समित्याच्या माध्यमातून चांगले काम झाले असेल त्या गावातील संबंधितांची दखल घेवून त्यांचा सन्मान करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, एक गाव एक गणपती ही अत्यंत चांगली संकल्पना असून गावाला एकजूट करण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. तंटामुक्त समित्या हया सक्र ीयपणे कशाप्रकारे काम करतील याचे नियोजन करावे. डॉ.भूजबळ म्हणाले, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या कामात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. भविष्यात जिल्ह्यात गाव पातळीवर तंटे होवूच नये यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. गाव पातळीवर सुरक्षा दल तयार करण्यात येतील. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे आले पाहिजे. गावाची सुरक्षा गावकऱ्यांच्या हाती देण्याचा आपला प्रयत्न असून याबाबत नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २५६ गावे तंटामुक्त झाले आहेत. यामध्ये नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या भागातील ११४ गावांचा समावेश आहे. ६२ ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. या ५५६ गावांना १४ कोटी ७ लक्ष २५ हजार रुपयाचे पुरस्कार देण्यात आला आहे. २०१५-१६ यावर्षात जुलै अखेर दिवाणी, महसूली, फौजदारी व इतर दाखल ६ हजार ३२० तंट्यांपैकी ४३९१ तंटे निकाली काढण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांनी दिली. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)