शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोरोना संकट काळात आयएमएने केला मदतीचा हात पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे, तर गोंदिया येथे दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सध्या गोंदिया येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत. एकूण रुग्णालयाच्या बेडपैकी सद्यस्थितीत ३० टक्के बेड हे बालाघाट जिल्ह्यातील रुग्णांनी भरले आहेत. जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यासह बाहेरील राज्यातील रुग्णांना देणार सेवा : नियमित ऑक्सिजन पुरवठा करण्याची केली मध्यप्रदेशाला विनंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात तसेच लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातसुध्दा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मध्यप्रदेशातील ३० टक्के रुग्ण गोंदिया जिल्ह्यात दाखल केले जात आहेत. त्यामुळे रुग्णालयातील खाटा फुल होत आहेत, तर ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशात शेजारधर्म पाळत जिल्ह्यासह बाहेरील राज्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयएमएने पुढाकार घेतला आहे. यासाठी संबंधित राज्यांनी नियमित ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली आहे. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे, तर गोंदिया येथे दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सध्या गोंदिया येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत. एकूण रुग्णालयाच्या बेडपैकी सद्यस्थितीत ३० टक्के बेड हे बालाघाट जिल्ह्यातील रुग्णांनी भरले आहेत. जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खा. प्रफुल्ल पटेल व प्रशासनाकडून आता रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाल्याने इंजेक्शनची फारशी समस्या नाही. मात्र, ऑक्सिजनची समस्या कायम आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. आ. विनोद अग्रवाल यांनी माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर ५० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात आले होते. दरम्यान, मध्यप्रदेशातील कोरोना बाधित रुग्ण गोंदिया जिल्ह्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात या रुग्णांवर उपचार करण्याची तयारी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने केली आहे. मात्र, यासाठी मध्यप्रदेश सरकारने नियमित ५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा जिल्ह्याला करण्याची विनंती केली आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास मदत हाेणार आहे. दरम्यान, संकटाच्या काळात आयएमएने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.  

दररोज ६५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यात दररोज ६५० ऑक्सिजन सिलिंडर लागत असून, ५०० सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. यामुळे १५० सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. अशात लगतच्या बालाघाट जिल्ह्याने नियमित ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केल्यास रुग्णांवर उपचार करण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन यांनी सांगितले.  

बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी बालाघाट जिल्ह्यातील ३० टक्के रुग्णांवर सध्या गोंदिया जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बालाघाट जिल्ह्याने दररोज ५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा गोंदिया जिल्ह्याला करावा, यासंदर्भात बालाघाटचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांच्याशी चर्चा केली. त्यांनीसुध्दा याला हिरवी झेंडी दाखविली. तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन यांना दिले.  

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टर