शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतुकीला अभय

By admin | Updated: September 10, 2014 23:46 IST

जिल्ह्यातील राज्य मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रक विभागाच्या कार्यप्रणालीने दुचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना कागदपत्रांची मागणी करून

दुचाकी चालकांचीच तपासणी : वाहतूक नियंत्रण विभागाचा अजब कारभारआमगाव : जिल्ह्यातील राज्य मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रक विभागाच्या कार्यप्रणालीने दुचाकीस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना कागदपत्रांची मागणी करून त्रास दिला जात असताना दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीला संरक्षण देण्यात येत असल्याचे चित्र आमगावसह इतर मार्गावर दिसून येत आहे.गोंदिया-आमगाव राज्य मार्ग कोहमारा, देवरी, आमगाव या मार्गावर पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रण पथकाद्वारे दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. वाहनधारकांना विविध आवश्यक कागदपत्रांची मागणी या पथकाद्वारे करण्यात येत आहे. परंतु पुराव्यासाठी लागणाऱ्या अनेक कागदपत्रांची सत्यप्रत असूनसुद्धा दुसरा पुरावा सादर करण्यास वाहनधारकांना सांगण्यात येत आहे. वेगळा पुरावा नसल्यावर स्पॉट चालान करण्याची ताकीद दिली जाते. त्यामुळे अनेक वाहनधारक याला बळी पडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहज करावा लागत आहे. या मार्गावर अनेक वाहतूक नियंत्रक अधिकारी-कर्मचारी चालान करण्याची सक्ती करून अधिक पैशाची मागणी करतात अशा तक्रारी वाढत आहेत. वाहतूक अधिकाऱ्यांची सक्ती टाळण्यासाठी हातावर मोजा व पुढे जा, अशा कानमंत्रामुळे वाहनधारकांची वाहतूक कर्मचाऱ्यांकडून लूट होताना दिसत आहे.आमगाव गोंदिया, गोरेगाव, देवरी या राज्य मार्गावर अनेक वाहनांची अवैध प्रवासी वाहतुक सर्रासपणे सुरु आहे. काळीपिवळी, टाटा मॅजीक व तीन चाकी आॅटो या वाहनांची अवस्था पाहिली तर प्रवाश्यांसाठी हा प्रवास जीवघेणा असतो. अनेक वाहनांमध्ये पायदान तर मागील भागाच्या दारापर्यंत उभे करुन प्रवास सुरु आहे. परंतु वाहतूक नियंत्रक कर्मचारी या जीवघेण्या प्रवासाला आळा घालण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे प्रवासी वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने नाईलाजाने प्रवाशांना त्यातून प्रवास करावा लागतो. या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याऐवजी वाहतूक विभागातील कर्मचारी दुचाकी वाहनधारकांकडून चलान करण्याच्या नावावर वसुली करीत आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांमध्ये वाहतुक विभागाविरुद्ध चिड निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)