शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटावरुन रेतीचा अवैध उपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 01:13 IST

पर्यावरण विभागाने लादलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नाही. त्यामुळे याचा रेती माफिया मोठ्या प्रमाणात फायदा घेत असून रेती घाटावरुन अवैधपणे रेतीचा उपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : शासनाचा महसूल पाण्यात, रेती माफियांकडे डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : पर्यावरण विभागाने लादलेल्या निर्बंधामुळे जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा अद्यापही लिलाव झाला नाही. त्यामुळे याचा रेती माफिया मोठ्या प्रमाणात फायदा घेत असून रेती घाटावरुन अवैधपणे रेतीचा उपसा सुरू आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे.रेती माफीया जिल्ह्यातील रेती घाटावरुन रेतीचा उपसा करून त्याची नागपूरसह इतर जिल्ह्यात सर्रासपणे वाहतूक करीत आहे. वैनगंगेच्या रेतीला नागपूर व इतर जिल्ह्यात मोठी मागणी आहे. रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन करुन डंपीग केले जाते. त्यानंतर रेती माफीया याची परस्पर विल्हेवाट लावतात.गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, सामटोला, महालगाव, देवरी, डांगोर्ली, कासा, तिरोडा तालुका, घाटकुरोडा, चांदोरी बु., कवलेवाडा, सावरा, अर्जुनी या रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशाची सीमा लागू असल्याने अर्जुनी, बोंडरानी, खैरंजाली, तिरोडा या मार्गाने रेतीची तस्करी केली जात आहे. किंडगीपार येथे मोठ्या प्रमाणात दगड उत्खननाचे काम नियमाला डावलून केले जात आहे.दरम्यान या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. ही बाब महसूल व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र ते याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे. शासनाने अवैध तस्करीवर आळा घालण्यासाठी दंडाच्या रक्कमेत वाढ केली. मात्र त्याचा कसलाही उपयोग झाला नाही.रेती तस्करीवर आळा बसावा यासाठी तालुकास्तरावर जिल्हास्तरावर व ग्रामस्तरावर दक्षता समिती तयार करण्यात आली. मात्र त्याचा सुध्दा कसलाच उपयोग झाला नाही.त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याकडे देवून व रेती घाटांना आकस्मीक भेटी देवून पाहणी केल्यास यातील खरे गौडबंगाल समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.मध्यप्रदेशच्या रॉयल्टीवर गोंदियातून रेतीचा उपसारेती माफियांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असून मध्यप्रदेशाच्या रॉयल्टीवर गोंदिया जिल्ह्यातील रेती घाटावरुन रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. शिवाय याच रॉयल्टीचा वापर करुन नागपूरसह इतर जिल्ह्यात सुध्दा रेतीची तस्करी केली जात असल्याची माहिती आहे.महसूल विभागाची मूक सहमतीमहसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या डोळ्या देखत रेती घाटावरुन अवैधपणे रेतीची वाहतूक सुरू आहे. मात्र ते कारवाई करण्याऐवजी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने यासर्व प्रकाराला त्यांची मूक सहमती असल्याचे चित्र आहे.रस्त्यांची दुर्दशातिरोडा तालुक्यातील घाटकुरडा, मुंडीकोटा, चांदणीटोला या रेती घाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात आहे. रात्रीच्या वेळेस रेतीची वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक केली जात असल्याने परिसरातील रस्त्यांची अंत्यत दुर्दशा झाली आहे. या संदर्भात गावकºयांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आलीे नाही.

टॅग्स :sandवाळू