शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पलटू पहाडीवर गिट्टीचे अवैध खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:35 IST

येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांची कारवाईची मागणी : परवाना एका जागेचा, खनन दुसऱ्या जागेतून

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील पलटू पहाडीवर मागील काही महिन्यांपासून गिट्टीचे अवैधपणे खनन सुरु आहे. महसूल व वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदर पहाडीवर मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. त्यामुळे वृक्षसंपदा ही नष्ट होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. वनाचे संवर्धन आणि अवैध खनन थांबविण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी गावकºयांनाच आपसांत समझोता करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.एका गट क्रमांकाचा परवाना घेवून दुसऱ्या गट क्रमांकातून अवैध खनन करण्याचा येथे गोरखधंदा सुरु असल्याची बाब देखील पुढे आली आहे. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करुन अवैध खनन थांबविण्याची मागणी नवेगावबांध येथील नागरिकांनी केली आहे.येथील पलटू पहाडीवरील गट क्र. १२२३ मधून गिट्टी खनन करण्याचा परवाना कंंत्राटदाराने घेतला. परंतु त्यांनी गट क्रमांक १२२३ मधून गिट्टी (बोल्डर) खनन न करता गट क्र. १२६२/१ या शासकीय जागेतून आराजी १५५.७६ हेक्टर आर पैकी १ हेक्टर मधून अवैधरित्या खनन केले आहे. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरु आहे. सदर प्र्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी महसूल विभागाचे प्रभारी तहसीलदार भंडारी यांना तक्रार केली. त्यांनी ३१ जानेवारी रोजी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट दिली व सदर अवैध खनन प्रकाराची पाहणी केली. यावेळी सरपंच अनिरुद्ध शहारे, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास बोरकर, सतिश कोसरकर, बाबुराव नेवारे, प्रकाश तरोणे, अहमद सय्यद, वरक्षक भोयर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.कंत्राटदाराला १२२३ गट क्रमांकाचा गिट्टी खननाचा परवाना असून लगतच्या १२६२/१ या गट क्रमांकात अवैध खनन केल्याची बाब निदर्शनास आली. पंचनाम्यात २० ब्रास गिट्टी असल्याचे निदर्शनास आले. मात्र कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सोडून गावपातळीवर समझोता करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप आहे. तहसीलदार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावरगट क्रमांक १२६२/१ हे मोठ्या वृक्षांचे जंगल आहे. यावर गावकऱ्यांचा निस्तार हक्क आहे. या अवैध खननाबरोबरच मोठ्या वृक्षांचे नुकसान होत असल्याने मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. काही वृक्षांच्या मुळांना खननादरम्यान धक्का बसून त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या भागातील वृक्ष देखील समूळ वाळत आहे. यावर वन विभागाची देखरेख असते. याबाबत उत्तर वनविभागाचे वनरक्षक भोयर यांना विचारणा केली असता त्यांनी काही माहिती नसल्याचे सांगितले. गावच्या नैसर्गिक संपत्तीची लूट होत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.