शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

उघड्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे दुर्लक्षच

By admin | Updated: June 15, 2014 23:36 IST

शहरात ठिकठिकाणी खड्डे उघड्यावर पडलेले आहेत. या गंभीर प्रकारावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला. मात्र एवढ्यावरही नगर पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर काहीच प्रभाव पडला नाही.

गोंदिया : शहरात ठिकठिकाणी खड्डे उघड्यावर पडलेले आहेत. या गंभीर प्रकारावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला. मात्र एवढ्यावरही नगर पालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर काहीच प्रभाव पडला नाही. कारण दोन दिवस लोटूनही शहरातील खड्डे जसेच्या तसे दिसून आले. मागील दोन दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस पडत आहे. अशात या खड्यांत पाणी भरून एखादा अपघात घडल्यास त्याला ती व्यक्तीच जबाबदार राहणार असा नियम नगर पालिकेने लागू केल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही. शहरातील बाजार परिसर, चांदनी चौक, शारदा वाचनालय परिसर, सिंधी कॉलनी, कुडवा लाईनसह अन्य भागांत रस्त्यावरील खड्डे उघड्यावर पडलेले आहेत. अंडरग्राऊंड नाल्यांची सफाई करण्याच्या दृष्टीने सोडण्यात आलेले हे आऊटलेट असून त्यावर झाकण न बसविल्याने हे खड्डे उघडेच आहेत. यातील कित्येक खड्डे मागील कित्येक वर्षांपासून उघडेच असून या खड्यांमुळे आजवर अपघातही घडल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगीतले. हीच समस्या आजही उद्भवत असल्याचेही चित्र बघावयास मिळत आहे. नेमकी हीच बाब लोकमतने १३ जून रोजी शहरवासी व नगर पालिकेच्या नजरेत आणून दिली. विशेष म्हणजे या समस्येवर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाईचे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र दोन दिवस लोटूनसुद्धा शहरातील हे खड्डे आहेत तसेच आहेत. यावरून नगर पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी किती कर्तव्य तत्पर व शहरवासीयांप्रती किती सजग आहेत याची प्रचिती येते. मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सर्वांना भांबाऊन सोडले. तर पहिल्याच पावसाने नगर परिषदेच्या स्वच्छता अभियानाची पोलखोल करून टाकली. अशात मात्र या खड्यांत पाणी भरून अपघात घडण्याची शक्यता टाळता येणार नाही. (शहर प्रतिनिधी)