शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:11 IST

अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून मागील दहा वर्षांपासून दिशाभूल केली जात आहे. आता या उमेदवारांना शासनाकडून नोकर भरतीवर बंद असल्याचे सांगितले जात असल्याने अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षाच होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रशासनाने दाखविले शासनाकडे बोट : उमेदवारांचा आमरण उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्रशासनाकडून मागील दहा वर्षांपासून दिशाभूल केली जात आहे. आता या उमेदवारांना शासनाकडून नोकर भरतीवर बंद असल्याचे सांगितले जात असल्याने अनुकंपाधारक उमेदवारांची पुन्हा उपेक्षाच होत असल्याचे चित्र आहे.शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाधारक उमेदवार म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले जाते. मात्र स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या धोरणामुळे मागील दहा वर्षांपासून जिल्ह्यातील ३५० अनुकंपाधारक उमेदवार शासकीय सेवेत रूजू होण्यापासून वंचित आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध पदभरती करिता या उमेदवारांकडे शैक्षणिक पात्रता आहे. मात्र यानंतरही प्रशासनानेतर्फे या उमेदवारांना आश्वासन देत नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. यापैकी बºयाच उमेदवारांचे वय ४५ वर्ष झाल्याने त्यांना सुध्दा शासकीय सेवेत रूजू होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. अनुकंपाधारक उमेदवारांनी यासंदर्भात जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना प्रत्येकवेळी केवळ आश्वासन दिले जात आहे. मागील पाच वर्षांत एकाही अनुकंपाधारक उमेदवाराला शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा अनुकंपाधारक संघर्ष समितीच्या नेतृत्वात या बुधवारी (दि.२७) उमेदवारांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.रविंद्र ठाकरे यांची भेट घेवून त्यांना निवेदन देत त्यांच्यासमोर समस्या मांडली. मात्र ठाकरे यांनी नोकर भरतीवर बंदी असल्याचे सांगितले. त्यामुळे अनुकंपाधारकांची समस्या कायम आहे.२६ जानेवारीपूर्वी अनुकंपाधारक उमेदवारांचा प्रश्न मार्गी न लावल्यास जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष भोला गुप्ता, संजय हत्तीमारे, संदीप मानकर, संजय शहारे यांनी दिला आहे.