शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आवडीनुसार शिक्षण मिळाल्यास प्राविण्य मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:34 IST

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला असते. त्यांच्यात विविध सुप्त गुण असतात. त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळाल्यास प्राविण्य प्राप्त होते, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : ‘लोकमत’ संस्काराचे मोती २०१७ बक्षीस वितरण

आॅनलाईन लोकमततिरोडा : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कला असते. त्यांच्यात विविध सुप्त गुण असतात. त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळाल्यास प्राविण्य प्राप्त होते, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.‘लोकमत’ संस्काराचे मोती २०१७ स्पर्धेचे बक्षीस वितरण वडेगाव येथील भीमरावजी विद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.बक्षीस वितरण आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने सरपंच तुमेश्वरी बघेले, प्राचार्य ए.डी. पटले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक खोब्रागडे, मोहन भगत, रामकला शेंदरे, मंजुषा भगत, योगीलाल ठाकरे, सरपंच अनिल बोपचे, तारेंद्र बिसेन, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय रहांगडाले, प्रफुल्ल टेंभेकर, मोहन भगत, बुधराज क्षीरसागर व कार्यक्रमाचे संयोजक डी.आर. गिरीपुंजे उपस्थित होते.आ. रहांगडाले पुढे म्हणाले, सचिन तेंडूलकर हा चांगला इंजिनिअर निश्चितच झाला नसता, परंतु तो यशस्वी क्रिकेकपटू झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करुन त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी वर्ग १० वीमध्ये कलचाचणी घेतली जात आहे. संस्कारातून विद्यार्थी व वातावरणातून मानव घडतो. बालपणातच चांगले संस्कार होणे आवश्यक आहेत. या शाळेचा गुणात्मक दर्जा संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यातही प्रसिद्ध आहे. विविध उपक्रम व विद्यार्थ्यांची शिष्यप्रियता सर्वश्रृत असून येथील शिक्षकांनी सुद्धा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे, असे ते म्हणाले.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी, विद्यार्थी हे कच्च्या मातीसारखे असून त्यांना जसे घडविले तसे घडू शकतात. विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहित केल्यास त्यांना आवड व ज्ञान प्राप्त होऊन मोठमोठ्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतील. त्यामुळे लोकमतचा हा उपक्रम अभिनव असल्याचे म्हटले.सरपंच तुमेश्वरी बघेले यांनी, विद्यार्थ्यांचे चारित्र्य उत्तम असावे. संपत्ती गेली तरी चालेल पण चारित्र्य जावू नये. चारित्र्य गेल्यास सर्वच गेल्याचे सांगितले. प्राचार्य ए.डी. पटले यांनी, विद्यार्थ्यांनी सतत मेहनत व सराव करुन यश प्राप्त करावे, असे सांगितले. डी.आर. गिरीपुंजे यांनी, ‘लोकमत’ वृत्तपत्रातील स्पर्धा परीक्षेची माहिती व तयारी यावर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी नृत्यसुद्धा सादर करण्यात आले.संचालन बी.यू. बिसेन यांनी केले. आभार डी.एस. बोदेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी जी.एन. बिसेन, यु.एफ. टेंभरे, आर.बी. भांडारकर, विजय खोब्रागडे, जयंत वासनिक, एम.एस. अंबादे, वसंत मेश्राम, अरविंद राठोड, एस.पी. भगत, व्ही. एच. जनबंधू, डी.जे. खांडेकर, वाय.के. पटले, अरुण मेश्राम, के.पी. उके, बी.पी. भारतकर, अरविंद टेंभेकर, संगीता वालदे, विनोद धावडे तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी सहकार्य केले.