शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

निवड चुकल्यास पाच वर्षाकरिता पश्चाताप कराल

By admin | Updated: October 29, 2015 00:12 IST

ग्रामपंचायत वरून नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर तेथील नागरिकांची जबाबदारी जास्त वाढली आहे.

विखे पाटलांचा इशारा : भाजप सरकारने केला भ्रमनिरासगोंदिया : ग्रामपंचायत वरून नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर तेथील नागरिकांची जबाबदारी जास्त वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत योग्य व्यक्तीला निवडून न दिल्यास पाच वर्षेपर्यंत पश्चाताप करण्याची वेळ येईल, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.ते देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व गोरेगाव येथील काँग्रेस उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आ.सुनील केदाम, आ.गोपालदास अग्रवाल, जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आ.रामरतन राऊत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना ना.विखे पाटील म्हणाले, या निवडणुकीत योग्य व्यक्ती आणि योग्य पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याकडे नागरिकांनी लक्ष दिले पाहीजे. गेल्या दिड वर्षात भाजप सरकारने सामान्य नागरिकांना काय दिले आणि काय हिरावले याचा विचार नागरिकांनी केला पाहीजे. २०० रूपये किलोची डाळ, १०० रुपये किलोचे कांदे तरीही शेतकऱ्यांची दुरवस्था, बेरोजगारी, खोटी आश्वासने यापलिकडे काहीही त्यांनी दिले नाही. यासोबतच आपल्यात नकली काँग्रेस पार्टी उभी झाली. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल, असे सांगून काँग्रेसच्याच उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.निवडणूक निरीक्षक नियुक्त जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून गडचिरोलीचे अपर जिल्हाधिकारी मंगेश आव्हाड हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३२८९८०० हा आहे. सडक-अर्जुनी नगर पंचायतीकरिता भंडारा येथील समाजकल्याणचे सहायक आयुक्त डी.एन.धारगावे निवडणूक निरीक्षक (८८०६१२३५०५), अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतीकरिता भंडारा येथील उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी.लोखंडे निवडणूक निरीक्षक (९९६००३८६८३), गोरेगाव नगर पंचायतीकरीता नागपूरचे वस्त्रोद्योग सहसंचालक (तांत्रिक) राजेश भुसारी (९८८१७५०५३५), देवरी नगर पंचायतीकरीता भंडाराचे शंकर किरवे हे निवडणूक निरीक्षक (९४०४८१०३५८) आहेत. निवडणुकीसंदर्भात काही तक्रारी असल्यास निवडणूक निरीक्षकांशी संपर्क करता येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आज अनेक नेत्यांची गर्दीनगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचार करण्यासाठी भाजपतर्फे पालकमंत्री राजकुमार बडोले दि.२९ ला गोंदियात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खा.प्रफुल्ल पटेल यांनी दोन दिवसात चारही नगर पंचायतीत प्रचारसभा घेतला. काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी सभा घेतल्या. गुरूवारी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सभा होणार आहेत.