शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

असे असेल तर दादा खरंच तुम्ही एकदा या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:30 IST

२००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले होते. रस्त्याच्या दुर्दशेवर ते सत्तापक्षावर बरीच आगपाखड करायचे.

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : २००९ ते २०१४ या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. त्या काळात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले होते. रस्त्याच्या दुर्दशेवर ते सत्तापक्षावर बरीच आगपाखड करायचे. सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या कार्यक्षेत्रात निधीच उपलब्ध करुन देत नाही अशी त्यांची खंत होती. ही खंत त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविली होती. बडोले साहेब आता तर तुम्ही सत्ताधारी पक्षात कॅबीनेट मंत्री आहात, तुम्हाला वडसा-कोहमारा रस्त्यांची दुर्दशा सुध्दा माहिती आहे. तुमचे विरोधक शासन व प्रशासनाला शरम नाही म्हणून चक्क रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून आंदोलन करीत आहेत.गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वडसा-कोहमारा हा मार्ग आहे. या मार्गावर ठिकठिकाणी असंख्य खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी लाखोंचा खर्च केला जातो. परंतु पुन्हा खड्डे जैसे थे राहत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढ्या रकमेत नवीन मार्ग तयार झाला असता असे प्रवाशांसह वाहनधारकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे. वाहन चालकांना अगदी जीव मुठीत धरुन वाहन चालवावे लागतात. अनेक ठिकाणी भगदाड पडले आहेत. त्यामुळे हा रस्ताच खड्डयात गेला आहे. परिणामी या रस्ता कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतात. दिवसेंदिवस या मार्गावर खड्यांची श्रृंखला वाढत आहे. सहा-सहा फुट लांबीपर्यंत रस्ता ठिकठिकाणी फुटला असल्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न वाहन चालकांना पडतो. रात्रीचे वेळी तर दुचाकीस्वारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने तर डोळे मिटूनच ठेवण्यात धन्यता मानल्याचे चित्र आहे.मागीलवर्षी याच मार्गाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दौरा केला होता. ते या मार्गाने जाणार असल्याचे नक्की झाल्यानंतर या रस्त्यावरील खड्डे बुजवून अगदी नववधूसारखी सजावट केली होती. हे जर मंत्रीमंहोदयाच्या आगमनाप्रित्यर्थ शक्य होत असेल तर ते इतर वेळात का होत नाही. हा बुचकळ्यात पाडणारा प्रश्न आहे. मागीलवर्षी महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा संकल्प शासनाने केला होता. यावर प्रचंड खर्च करण्यात आला. त्याचठिकाणी व काही नवीन भागात पुन्हा नव्याने आता खड्डे पडू लागले आहेत. एवढ्या खर्चात नवीन रस्ता तयार झाला असता याकडे कुणाचेही लक्ष नाही. म्हणून एकदा सांगावेसे वाटते की, दादा तुम्ही एकदा नक्कीच या! निदान आपल्या पदस्पर्शाने पुन्हा एकदा या रस्त्यावरील खड्डे बुजतील व वाहनचालकांना हायसे वाटेल. अलीकडे रस्त्याचे ही राजकारण होऊ लागले. साकोली-वडसा-गडचिरोली व कोहमारा-वडसा-गडचिरोली हे ३५३ सी क्रमांकाचे समांतर रस्ते आहेत. कलकत्ता, मध्यप्रदेश व छत्तीेसगड या मार्गाने गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक ही कोहमारा-वडसा या मार्गाने होते. याऊलट कोहमारा ते साकोली व पुढे वडसा हा अधिक किमी व वेळ घेणारा मार्ग आहे. शिवाय साकोली-वडसा या मार्गावरील अनेक गावातील घरे ही रस्त्याला लागून आहेत. एकतर या रस्त्यावरील घरे पाडली जातील किंवा गावाबाहेवरुन नवीन मार्ग तयार करावा लागेल. अशी परिस्थीती वडसा-कोहमारा मार्गावरील गावाची नाही.तरी सुध्दा येथे ही राजकारण झाले व साकोली-वडसा या मार्गाला झुकते माप देऊन तिथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. उलटपक्षी कोहमारा-वडसा हा मार्ग मात्र दुर्लक्षितच आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRajkumar Badoleराजकुमार बडोले