शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित पत्नीला अश्लील चित्रफित दाखवून पती करायचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2023 20:27 IST

Gondia News लग्नानंतर पतीने अश्लील चित्रफित दाखवून केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या दहशतीपायी पत्नीने थेट पोलिसात धाव घेत दाद मागितली आहे. 

गोंदिया: लग्नानंतर पतीने अश्लील चित्रफिती दाखवून केलेल्या अनैसर्गिक अत्याचाराच्या दहशतीपायी पत्नीने थेट पोलिसात धाव घेत दाद मागितली आहे. 

गोंदिया शहराच्या गांधी वॉर्डातील एका २३ वर्षाच्या नववधूने गोंदिया शहर पोलिस ठाण्यात २० जून रोजी केलेल्या तक्रारीनुसार तिचा पती आरोपी हा ३० वर्षाचा आहे. त्या दोघांचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे २४ एप्रिल २०२३ ला झाले. परंतु लग्न झाल्यापासून आरोपी दारू पिऊन घरी आल्यावर तिला मारहाण करायचा. तिच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार करायचा. तिच्या विरोधात त्याची नागपूर येथील बहिणी भडकावित असल्याचाही आरोप तिने दिलेल्या तक्रारीतून केला आहे. आरोपी पती तिला मारहाण करायचा. पुढे ठार करण्याची धमकीही त्याने तिला दिली आहे. यापूर्वी तिला मारहाण झाल्याने तिने ही गोष्ट आपल्या माहेरच्या लोकांना सांगितल्यावर त्यांच्यात चर्चा झाली. त्याने त्या चर्चेत त्याने तिला त्रास देणार नाही अशी हमी मुद्रांकावर लिहून दिली होती. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आरोपी पतीवर भादंविच्या कलम ३७६ (२), (एन), ३७७, ३२५, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामभाऊ व्होंडे करीत आहेत.अश्लील चित्रफित दाखवायचापत्नीला अश्लील चित्रफित दाखवून तिच्यावर तो अनैसर्गिक अत्याचार करायचा. या कृत्याला तिने विरोध दर्शविल्यावर तिला तो मारहाण करायचा. लग्नापासून सुरू असलेल्या या कृत्याला कंटाळून तिने पोलिसात तक्रार केली आहे. अश्लील चित्रफितमध्ये पाहिलेले क्षण तो प्रत्यक्षात कृती करण्याचा प्रयत्न करायचा असा आरोप त्याच्याविरूध्द केलेल्या तक्रारीत केला आहे.निर्वस्त्र करून घराबाहेर काढलेआरोपी पतीने ६ जून रोजी त्याच्या कृत्याचा विरोध तिने केल्यावर आरोपीने तिला निर्वस्त्र करून घराबाहेर काढले होते. ती गोष्ट तिने आपल्या आईवडीलांना सांगितल्यावर त्याने माफी मागून यापुढे असे कृत्य करणार नसल्याची हमी मुद्रांकावर लिहून दिली आहे.त्याची इच्छा पूर्ण न झाल्यास ॲसीड टाकण्याची धमकी२० जून रोजी पहाटे ३ वाजता त्याने पत्नीला अनैसर्गिक कृत्य करण्याची इच्छा जाहीर केली. परंतु त्याच्या या कृत्याला तिने नकार दिले असता तिला मारहाण करून तू माझी इच्छा पूर्ण केली नाही तर तुझ्यावर ॲसीड टाकून ठार करील अशी धमकी दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी