शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

जखम गुडघ्याला, पट्टी कपाळाला

By admin | Updated: July 2, 2014 23:21 IST

नगर परिषदेकडून शहरात विविध योजनेंंतर्गत रस्ता दुरूस्तीची कामे केली जात आहेत. कोट्यवधींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या या कामांत गरज असलेल्या रस्त्यांना हुलकावणी देत चांगल्या रस्त्यांवर

गोंदिया : नगर परिषदेकडून शहरात विविध योजनेंंतर्गत रस्ता दुरूस्तीची कामे केली जात आहेत. कोट्यवधींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या या कामांत गरज असलेल्या रस्त्यांना हुलकावणी देत चांगल्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे जखम गुडघ्याला आणि पट्टी कपाळाला अशी स्थिती रस्ता दुरस्तीच्या बाबतीत निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे सिव्हील लाइंस परिसरातील कित्येक रस्ते वाहनांसाठी तर सोडाच पायी चालण्यासारखेही राहिलेले नाहीत. मात्र त्याकडे पालिकेचे साफ दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची पार वाताहात झाली आहे. अधिकांश रस्ते उखडून गेले असून खड्डेमय झाले आहे. पाऊस पडताच या रस्त्यावरून चालणेही कठीण होणार आहे. पण नगर परिषदेला त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. जनआक्रोश बघता नगर परिषदेने विविध योजनांतून रस्ता दुरूस्तीची कामे तर सुरू केली, पण त्यात कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यावे याबाबतचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील विविध प्रभागांतील रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण सुरू आहे. मात्र यातील अनेक रस्त्यांचे काम पाहता खरोखरच त्या मार्गावर पुन्हा-पुन्हा डांबरीकरण करण्याची गरज होती का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील जे रस्ते खराब झालेले नाहीत त्यांची दुरूस्ती करण्यात आली, मात्र जे पूर्णपणे उखडून गेले त्यांच्याकडे कुणी फिरकूनही बघितले नाही. यामध्ये शहराच्या मध्यवस्तीमधील सिव्हील लाईंन परिसरातील रस्त्यांवरून एक फेरफटका मारल्यास नगर परिषदेच्या नाकर्तेपणाबद्दल आणि या वॉर्डातील नगरसेवकांच्या दुर्लक्षितपणाबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही शहरातील सिव्हील लाईंन परिसर म्हटल्यानंतर तो त्या शहरातील सर्वाधित सोयीसुविधांनी युक्त असतो. गुळगुळीत रस्ते व साफसफाई ही त्या परिसराची विशेष ओळख असते. गोंदियातील सिव्हील लाईन परिसर मात्र याला याबाबतीत अगदी उलट आहे. नेहरू चौकापासून सुरू होणारी रस्त्यांची दुर्गती हनुमान मंदिर ते बाजपेयी ड्रायव्हींग स्कूल रस्ता, नेहरू चौक ते पुढे मामा चौक अशा मुख्य रस्त्यांवरही स्पष्टपणे दिसून येते. या परिसरातील नागरिक या दुर्गतीला कंटाळून गेले आहेत. येथील नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक सुद्धा यावर काहीच आवाज उठवायला तयार नाहीत. अन्य प्रभागांवर नजर टाकल्यास रस्त्यांची समस्या सिव्हील लाईंनच्या तुलनेत कमी दिसून येते. असे असतानाही तेथे मात्र रस्त्यांची कामे जोमात सुरू आहेत. मग सिव्हील लाईंन परिसरच का उपेक्षित? असा सवाल आता येथील रहिवासी करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)