निंबा (तेढा) : गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाºया ग्राम निंबा, तेढा, गोवारीटोला, तुमसर, हलबीटोला, तानुटोला, कन्हारटोला आदी गावांमध्ये १९ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ व वादळी पाऊस आला. याचा जोरदार फटका गावकरी व शेतकरी बांधवांना बसला आहे. या क्षेत्रात वादळ आल्यापासून वीजसेवा तसेच वाहतूक ठप्प पडली आहे. वीजेच्या तारांवर तसेच रस्त्यांवर आणि शेतशिवारात मोठमोठी झाडे पडल्याने वीजेच्या तारा तुटून खाली पडल्या आहेत. तसेच धान पिकाची मोठी नासाडी झाली आहे. कित्येक घरांवरील छत खाली कोसळले आहेत. घरांमधील सामानात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. वीज नसल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. रात्रीच्या वेळी जीवितहानी तसेच कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून विद्युत सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी गावकºयांची आहे.(छाया-मनीष बिजेवार)
चक्रीवादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 22:03 IST
गोरेगाव तालुक्यांतर्गत येणाºया ग्राम निंबा, तेढा, गोवारीटोला, तुमसर, हलबीटोला, तानुटोला, कन्हारटोला आदी गावांमध्ये १९ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ व वादळी पाऊस आला.
चक्रीवादळाचा फटका
ठळक मुद्दे१९ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ व वादळी पाऊस