तोंडचा घास पळविला : उन्हाळी पिकांचे नुकसान, वीजेच्या तारांसह घरांचे छप्परही उडालेगोंदिया : बुधवारच्या मध्यरात्रीनंतर गोंदिया तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह वादळ सुटल्याने मध्यरात्री तीनही तालुक्यातील अनेक भागात उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान केले. एवढेच नाही तर वृक्ष आणि विजेचे खांबही कोलमडून पडले. काही ठिकाणी पावसासोबत गारपिटही झाली.गोरेगाव : तालुक्यातील सटवा, डव्वा, गणखैरा, चिचगाव या क्षेत्रात दि.२८ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता अचानक आलेल्या चक्रिवादळ व २५० ग्रॅम इतक्या मोठ्या गारपीटीने सटवा, डव्वा या गावातील घरावरील कवेलू, टिनपत्रे, सिमेंटपत्रे, छपरासह उडून दूरपर्यंत गेल्याने अक्षरश: घरे उघडी पडली. शेतातील कापणीला आलेले रबी धानाचे पीक पूर्णपणे गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच पळवल्या गेला.सटवा, डव्वा या गावात चक्रिवादळाने थैमान घातल्याने अक्षरश: १०० वर्षे जुन्या व नव्या घरावरील छप्पर उडाल्याने अनेक परिवारांना उघड्यावर यावे लागले. तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह काही गावांची पाहणी केली. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, कृषी विस्तार अधिकारी व्ही.एस.राठोड, डी.के.रामटेके, पं.स.सदस्य केवलराम बघेले यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी दिल्या व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गावकऱ्यांनी तातडीने शासकीय मदतीची मागणी यावेळी केली. तहसीलदार डहाट यांनी तलाठी संपावर असताना आपतकालीन सेवा म्हणून चौधरी व चुटे या तलाठ्यांना क्षेत्राचा सर्वे करण्यास पाठवून आपली जवाबदारी पार पडली. चक्रिवादळ व गारपिटीमुळे धान पिकाचे, बागायती शेतीचे, घरांचे व विद्युत विभागाचे नुकसान झाले. विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. शेतातील मोठमोठेी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सटवा येथील उमराव रहांगडाले यांचा गोठा पडल्याने दुभती गाय मृत पावली. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने घरच उघडे पडले आहे. त्यामुळे घरातील सामानासह धान्याचे नुकसान झाले. पं.स.सभापती दिलीप चौधरी व उपसभापती बबलू बिसेन यांनी शासनाकडून तातडीची मदत मिळवण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले. यावेळी सटवाचे सरपंच रमेश ठाकूर, डव्वाचे सरपंच जगदिश बोपचे यांनी गावकऱ्यांच्या मदतीसाठी धावून दिवसभर अनेकांच्या संपर्कात राहून तातडीची मदत मिळावी म्हणून प्रयत्नरत असल्याचे सांगितले.लग्नमंडप उडालेपरसवाडा : रात्री ११ नंतर अचानक मेघ गर्जनेसह गारपीट व वादळी पाऊस सुरू झाल्याने लग्नघरी चांगलाच त्रास सहन करावा लागला.
चक्रीवादळ आणि गारपीटीचे थैमान
By admin | Updated: April 29, 2016 01:45 IST