शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार बालकांना जेवण देणाऱ्या उपाशी

By admin | Updated: March 12, 2017 00:23 IST

तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा, खाजगी अनुदानीत ३७ असे १७५ शाळा आहेत.

अल्पसे मानधन : चार महिन्यांपासून मोबदलाच नाही अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत जिल्हा परिषदेच्या १३८ शाळा, खाजगी अनुदानीत ३७ असे १७५ शाळा आहेत. इयत्ता १ ली ते ८ वीच्या २० हजार २९७ विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्याचे काम ३४० स्वयंपाकी व मदतनीस एक हजाराच्या अल्प मानधनावर करीत आहेत. परंतु या महिलांना मागील ४ महिन्यापासून त्यांच्या कामाचा मोबदला न मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उमासमारीची वेळ आली. सर्वशिक्षा अभियानांतर्गत मागील काही वर्षापासून शालेय पोषण आहार योजना शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांची गळती थांबावी, गावातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये, सामान्य विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेमध्ये शासनाच्या वतीने मध्यान्ह भोजनाची व्यवस्था करण्यात आली. इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गावातील महिलांची स्वयंपाकी व मदतनिस म्हणून शाळा समिती मार्फत निवड केली जाते. निवड झालेल्या स्वयंपाकी व मदतनीस महिलांना एका महिन्यापोटी सरसकट एक हजार रुपये असे अल्पशे मानधन दिले जाते. देण्यात येणारा हा तुटपुंजा मोबदलाही दर महिन्याला त्यांच्या हातात मिळत नाही. मोलमजूरी करणाऱ्या विधवा महिला आहार शिजविण्याच्या कामावर येतात. त्या महिला दिवसभर राबून दर महिन्याला हजाराची नोटाच्या मोबदल्यासाठी पंचायत समितीच्या पायऱ्याही झिजवतात. दिवसापोटी ३० रुपये ३३ पैसे रोजी घेऊन प्राथमिक शाळेतील मुलांना दुपारचे जेवण वाढणाऱ्या स्वयंपाकी व मदतनिस आज आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवतील याचेही आत्मचिंतन सरकारने करणे गरजेचे आहे. दर महिन्यापोटी मोबदला मिळत नाही अशी व्यथा स्वयंपाकीन महिलांनी मांडली. महिन्यापोटी एक हजार रुपयाचा मानधन काढण्याची तसदी संबधीत विभाग घेत नाही. गेल्या आॅक्टोबर महिन्यापासून शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या मोबदल्याचे पैसे अजून पावेतो मिळाले नाही. शाळेत मध्यान्ह भोजन शिजविण्याचे काम करताना इतर दुसरे काम करता येत नाही. हीच अल्पशी मजूरी त्या महिलांच्या कुटूंबाच्या चरितार्थाची शिदोरी आहे. चार-चार महिन्याचे मानधन थकीत असल्याने त्या सामान्य महिलांवर आज उपासमारीची पाळी आल्याचे चित्र आहे. पैशाअभावी येणाऱ्या सणावर पाणी फेरावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)