शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

तिरोडा तालुक्यातील बिडी कामगारांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

२० मार्चपर्यंत बिडी कंपनीने घरखाता बिडी कामगारांच्या बिड्या घेतल्या. मात्र २२ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत बिडी कामगार कामापासून वंचित आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने ३१ मे पासून लॉकडाऊन शिथिल केले व १ जून पासून जिल्ह्यात छोट्या मोठ्या उद्योगांना सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व बिडी उद्योग सुरु करण्यात आले. परंतु मे. हाजी लतीफ गन्नी बिडी कंपनी सुरु झाली नाही.

ठळक मुद्देबिडी कंपनी मालकाचे दुर्लक्षित धोरण : जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची कामगारांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा (बुजरुक) : तिरोडा येथील मेसर्स हाजी लतीफ गन्नी बिडी मॅन्युफॅक्चर कंपनीचे मालक हाजी असरफ सेठ अ‍ॅड ब्रदर तसेच फॅक्टरी मॅनेजर यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या कंपनीतील १२० घरखाता बिडी कामगार, रेलाई कामगार व कर्मचारी यांच्यावर मागील ५ महिन्यांपाूसन काम बंद असल्याने उपासमारीचे संकट ओढावले आहे. बिडी बनविण्याचे काम सुरु करा असे निवेदन बिडी कंपनी मालकांना कामगारामार्फत देण्यात आले. परंतु त्यांनी कामगारांना अद्याप कामावर चालू करुन घेतले नाही. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना निवेदन देवून बिडी कामगारांच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी कामगारांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार मेसर्स हाजी लतीफ गन्नी ही फार जुनी बिडी कंपनी आहे. या कंपनीचे मालक हे नागपूर येथील हेड ऑफीसमध्ये राहतात. २० मार्चपर्यंत बिडी कंपनीने घरखाता बिडी कामगारांच्या बिड्या घेतल्या. मात्र २२ मार्च रोजी लॉकडाऊन करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत बिडी कामगार कामापासून वंचित आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने ३१ मे पासून लॉकडाऊन शिथिल केले व १ जून पासून जिल्ह्यात छोट्या मोठ्या उद्योगांना सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व बिडी उद्योग सुरु करण्यात आले. परंतु मे. हाजी लतीफ गन्नी बिडी कंपनी सुरु झाली नाही.या संदर्भात बिडी सप्लायर ठेकेदार व कामगारांनी कंपनीमध्ये जाऊन विचारले असता ८ जूनपर्यंत काम सुरू करण्याची माहिती देण्यात आली. परंतु वारंवार कंपनी मॅनेजरशी संपर्क साधला असता उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. यावर बिडी कामगारांनी माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या माध्यमातून कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.कामगार न्यायालयाने २९ जून आणि ७ जुलै रोजी मालक व मॅनेजरला बिडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी बोलविले असता ते ते आले नाही. कामगार अधिकारी गुणवंत पंधरे यांनी कंपनी मालक हाजी असरफ यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता ते स्वत: बोलले, परंतु मालक नसल्याचे सांगून फोन बंद केला.येथील १२० बिडी कामगार व कर्मचारी कामापासून वंचित आहेत. काम नाही तर पगार कुठून मिळणार. येथील सर्व घरखाता बिडी कामगार या कंपनीवर अवलंबून आहेत. काम बंद झाल्याने येथील सर्व कामगार रस्त्यावर आले आहेत. या सर्व कामगारांचा बिडी बांधणे हाच एकमेव रोजगार असून कंपनी मालकाने बिडी कामगारांना कामापासून वंचित ठेवले आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून येथील कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कामगारांची आहे.बिड्या तयार करण्याच्या दरात तफावतघरखाता बिडी कामगारांना सन २०१६ पासून बिडीचा प्रती हजार दर ८० रुपये देण्यात येतो. तसेच बिडी सप्लायर ठेकेदारांना प्रती हजार फक्त साडे एकोणपन्नास पैसे कमिशन देतात. दुसऱ्या बिडी कपंन्या प्रती हजार १०५ रुपये देत असून ही कंपनी सन २०१६ पासून कामगारांचे शोषण करीत आहे. या कंपनीमधील सर्व कामगार स्थायी असून त्यांचे प्राव्हीडंट फंड सुद्धा कपात केले जाते. सर्व कंपन्या बिडी कामगारांना लागू असलेल्या सर्व सोयी किमान वेतन कायदा, बोनस कायदा, ग्रॅज्युएटी, पगारी सुटी, स्पेशल अलाऊंस देतात. परंतु ही कंपनी कामगारांना या सोईपासून वंचित ठेवीत आहे. मागील ५ वर्षांपासून बोनस व स्पेशन अलाऊंस देण्यात आला नाही. त्यात आता मागील ४ महिन्यांपासून काम बंद असल्याने बिडी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.कामगार अधिकाºयांनी बिडी कंपनी मालकांना फोन केला असता त्यांनी खोटे बोलून फोन कापला व न्यायालयाचा अवमान केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या कंपनी मालकाविरोधात कार्यवाही करण्याचे आदेश देवून कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा बिडी कपंनी मालकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उभारु. शिवाय कामगार अधिकारी गुणवंत पंधरे यांनी सुद्धा कंपनी मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा.-दिलीप बन्सोड,माजी आमदार तिरोडा

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी