शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बारदाण्याअभावी शेकडो क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:19 IST

येथील आदिवासी सहकारी सेवा सहकारी संस्थेत मागील महिनाभरापासून बारादाणा उपलब्ध नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : आदिवासी विकास महामंडळाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : येथील आदिवासी सहकारी सेवा सहकारी संस्थेत मागील महिनाभरापासून बारादाणा उपलब्ध नसल्याने धान विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.या सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन महिनाभरापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर धान खरेदी करणारी संस्था शेतकऱ्यांच्या विश्वासाची असल्याने या केंद्रावर शेतकरी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणतात. मात्र यंदा सुरूवातीपासूनच बारदाणा उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.संस्थेला सुरूवातीला बारदान्याऐवजी ७१०० कट्टे उपलब्ध करुन देण्यात आले. खरेदी केंद्रावर शेतकºयांना बारदाना उपलब्ध होत नसल्याने धान विक्रीस आणण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. तर बारदाण्याअभावी शेकडो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. या आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थे अंतर्गंत येणाऱ्या धान खरेदी केंद्रात १३ गावांचा समावेश आहे. मात्र मागील महिन्याभरापासून बारदान्याचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी बाहेरुन बारदाना खरेदी करुन धान विक्रीस न्यावा लागत आहे.त्यामुळे याचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. तर बारदान्याअभावी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, कवठा, सुकडी, खैरी, ब्राम्हणटोला, दाभना, डोंगरगाव, चापटी,अरततोंडी परिसरातील शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून बारदाना उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे.अनेक दिवसांपासून या संस्थेत बारदाणा उपलब्ध नाही. या संस्थेच्या पदाधिकाºयांनी बारदाना उपलब्ध करुन द्यावा. बारदाण्याअभावी धान विक्री करण्यास अडचण निर्माण होत आहे.-दिलवर रामटेके, शेतकरी येरंडी....................................................महामंडळाकडून बारदाणा मिळाला नाही. पर्यायी व्यवस्था किंवा धान केंद्रावर खरेदी कराता यावी, यासाठी आम्ही शेतकºयांचा ७१०० बारदाणा पंधरा रुपये दराने उपलब्ध करुन दिला आहे.-एल.बी. बागडे,सचिव, आदिवासी विविध सेवा सहकारी संस्था,बाराभाटी.....................................................आम्ही दोन महिन्यांपासून बारदाणा टेंडरसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. टेंडर पास झाले परंतु कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराकडून अद्यापही बारदाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही.- राहुल पाटील, व्यवस्थापकआदिवासी महामंडळ कार्यालय, प्रादेशिक सह उपायुक्त नवेगावबांध .

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड