शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो एकरातील धान भरलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:19 IST

शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकºयांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका : महाबीजने विश्वासघात केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाऊस समाधानकारक झाल्याचे पाहून महागडे व विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे सह्याद्री ४ चे धानाचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केले. सदर बियाणांचे रोप व्यवस्थीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकाची रोवणी केली. प्रमाणानुसार खताची मात्रा दिली. अनेक शेतकऱ्यांनी श्री पध्दतीने धान पिकाची लागवड केली.कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर धानाची लागवड करण्यात आली. वेळेवर धानाला लोंब लागले परंतू २० ते २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी धानाचे लोंब भरलेच नाही. पोसट लोंब निघाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन घेताच आले नाही. या धानापासून केवळ तणसीच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.कोयलारी येथील डॉ. मुकेश पटले यांनी त्यांच्या सहा एकर शेतात सह्याद्री ४ या धानाची लागवड केली. पिकाला वेळोवेळी खत व पाणी दिले. मात्र लोंब येवून सुध्दा धान भरल्यामुळे सदर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. दरम्यान याची तक्रार तालुका कृषी अधिकारी व महाबीजकडे करण्यात आली आहे.याप्रकरणी संबंधित कृषी अधिकारी व महाबीजने लक्ष देवून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी मुकेश पटले, चंद्रराज कटरे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.सह्याद्री ४ हे महाबीजचे बियाणे १६ जूनला नागपुरे कृषी केंद्र बिर्सी येथून ०५४४६ या बॅच क्रमाकांचे १२ पोती खरेदी करुन त्याची शेतात लागवड केली. मात्र धानाचे लोंब भरलेच नाही त्यामुळे पूर्ण हंगामाला मुकावे लागले असून मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महाबीजने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.-डॉ. मुकेश पटले, शेतकरीशेतकऱ्यांनी सह्याद्री ४ या महाबीजच्या बियाणांची व्यवस्थीत पेरणी करुन पीक लावले होते. पीक उत्तम होते. किडरोगांचा प्रादुर्भाव देखील नव्हता. मात्र धान भरलेच नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.- एम.डी.डोंगरवार, कृषी सहायक.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती