शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

शेकडो आशा सेविका उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

आरोग्य विभागात आशा सेविका हे स्थायी पद निर्माण करावे, त्यांना सेवेत कायम करावे व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे,अशी मागणी आशा सेविका महिलांनी केली आहे. आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात आशा सेविकांना मिळणारा मोबदला फारच अत्यल्प आहे. अत्यल्प मानधनात कुटुंबाचा उदरिनर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमासिक वेतन द्या : अत्यल्प मोबदल्यावर करताहेत काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने लोकसंख्येच्या निकषावर गावागावात आशा सेविका म्हणून सुशिक्षित महिलांची नेमणूक केली. या आशा सेविका महिला आरोग्य विभागाची संलग्नित असून त्या आपल्या नेमून दिलेल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. मासिक वेतनाची मागणी थंडबस्त्यात असून आशा सेविका महिलांची अत्यल्प मोबदल्यावर बोळवण सुरू आहे.आरोग्य विभागात आशा सेविका हे स्थायी पद निर्माण करावे, त्यांना सेवेत कायम करावे व इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन देण्यात यावे,अशी मागणी आशा सेविका महिलांनी केली आहे. आजच्या धकाधकीच्या व महागाईच्या काळात आशा सेविकांना मिळणारा मोबदला फारच अत्यल्प आहे. अत्यल्प मानधनात कुटुंबाचा उदरिनर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. आशा सेविका संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद व संबंधित विभागाच्या बदल्यावर शासन व प्रशासनाकडून बोळवण होत असल्यामुळे त्या-त्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. आशा सेविका महिलांना गाव सर्वेक्षण, वयोगटानुसार यादी तयार करणे आदी कामे करावी लागतात. हिवताप, क्षयरोग आदी आजारावरील गोळ्या घरोघरी जाऊन वाटप करावे लागते. मात्र मिळणारा मोबदला फारच कमी आहे.असा मिळतो मोबदलारोजगार हमी योजनेचे काम करणाºया मजुरापेक्षाही आशा सेविका महिलांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. गावातील नेमून दिलेल्या प्रभागात बीपीएलधारक गर्भवती महिलेची प्रसूती होईपर्यंत सेवा सुश्रृषा केल्यास केवळ ६०० रूपये मोबदला मिळतो. दारिद्रयरेषेखाली नसलेल्या गर्भवतींना सुश्रुषेचा काहीच मोबदला मिळत नाही. गर्भवती स्त्रीचा प्रसूती काळ हा ढोबळमानाने २७० ते २८० दिवसांचा असतो. आशा सेविकेला मासिक सभेचा उपस्थिती भत्ता १५० रूपये, पोलिओ लसीकरणाचे १०० रु पये, एका महिन्यातील दोन लसीकरणाचे २०० रूपये, गोवर लाभार्थ्यांचे ९ महिन्याचे १०० रूपये, बुस्टर डोजचे ५० रूपये, मलेरियाचा रूग्ण आढळल्यास ५० रूपये, कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी २५० रूपये मोबदला दिला जातो.

टॅग्स :Teacherशिक्षक