शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

नवेगावबांध : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जातून मुक्त करण्यासाठी दोनदा कर्जमुक्ती योजना राबवली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ...

नवेगावबांध : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जातून मुक्त करण्यासाठी दोनदा कर्जमुक्ती योजना राबवली होती. २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि त्यानंतर महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना राबविली होती. या योजनांचा अनेक शेतकऱ्यांना लाभसुध्दा मिळालेला आहे. पण या योजनांपासून अजूनही काही शेतकरी वंचित आहेत.

२०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून काही शेतकऱ्यांना लाभ मिळालाच नाही. शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमध्ये शेतकरी पात्र तर आहेत, पण ते शेतकरी कर्जमुक्त झालेच नाहीत. याचा परिणाम त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केल्यास तुमच्या नावाचे आदेश आलेच नाहीत असे सांगितले जाते. त्यानंतर महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. या योजनेतसुध्दा त्यांना लाभ मिळाला नाही. बहुतांश शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा परिपूर्ण लाभ मिळालेला आहे. नवेगावबांध येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २५ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित होते. त्यापैकी ३ शेतकऱ्यांच्या नावे महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या यादीत समाविष्ठ होते. त्या ३ शेतकऱ्यांना लाभ पण मिळाला, मात्र उर्वरित २२ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.