शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

लोहयुक्त गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांंना लागली हागवण

By admin | Updated: June 9, 2014 23:42 IST

विद्यार्थ्यांंमध्ये असलेली आयर्नची कमतरता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांंच्या प्रकृतीवर होणारे परिणाम लक्षात घेता शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांंना आयर्नच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला गेला होता.

गोंदिया : विद्यार्थ्यांंमध्ये असलेली आयर्नची कमतरता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांंच्या प्रकृतीवर होणारे परिणाम लक्षात घेता शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांंना आयर्नच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र काही विद्यार्थ्यांंना भोवळ तर कुणाला हागवणीचा त्रास झाल्याने वेगवेगळ्या शाळांमधील शिक्षक मुलांना या गोळ्या द्याव्यात की, नाही याबाबत संभ्रमात आहेत. डॉक्टर्स मात्र आर्यनमुळे फायदा होतो फक्त ती देण्याची पध्दत योग्य नसावी असे सांगत आहे. राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांंमध्ये आर्यनची कमतरता मोठय़ा प्रमाणात असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालय, आरोग्य विभागाच्या शालेय पोषण, आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांंना आयर्नमुक्त गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ ऑगस्ट २0१0 रोजी राज्य शासनाने याबाबत शासन निर्णय काढून राज्यातील सर्व उच्च प्राथमिक शाळातील ११ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांंना या गोळ्या देण्याचे आदेश दिले. सध्या राज्यात शिक्षण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. यासाठी राज्य शासनाने झिम लेबॉरटीजच्या माध्यमातून या गोळ्यांचा पुरवठा करण्याचे आदेशही दिले आहेत. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दुपारच्या जेवणानंतर आयर्नच्या गोळ्या दररोज एक या प्रमाणात देण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यात ४१ कोटी ७९ लाख गोळ्यांचा पुरवठा केला जातो. या गोळ्यांचा दुष्परिणामामुळे जीव मळमळणे, हगवन लागणे, चक्कर येणे ही लक्षणे उद्भवतात त्यातही सिकलसेल आणि अशक्तपणा असलेल्या विद्यार्थ्यांंना या गोळ्या दिल्यास त्यांना दुष्परिणाम होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी सिकलसेलसाठी ८ हजार विद्यार्थ्यांंंची तपासणी करण्यात येते. यातील ३00 विद्यार्थी सिकलसेल असल्याचे आढळून आले. वयोगट ११ ते १८ च्या विद्यार्थ्यांंना या गोळ्या देण्याचे फर्मान काढण्यात आले. परंतु सुखवस्तू घरातील जे विद्यार्थी आहेत. त्यांच्यामध्ये आयर्नचे प्रमाण पुरेपूर आहेत. त्यांना या गोळ्या देण्याचे प्रयोजन काय? सिकलसेलग्रस्त विद्यार्थी शिक्षक कसे ओळखणार? ज्यांना या गोळ्यामुळे साईड इफेक्ट होऊ शकतो, त्यांचे काय? मुळात आयर्नच्या गोळ्या विद्यार्थ्यांंंची बुध्दिमत्ता वाढविण्यास मदत करतात. मात्र त्या घेण्याची पध्दत कोणती यावर त्याचे साईड इफेक्टस दिसून येतात. याबाबत शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याची गरज आहे. केवळ चुकीच्या पध्दतीने या गोळ्या दिल्यानेच साईड इफेक्टस दिसून येतात. शिक्षण संचालनालयाच्या निर्णयानुसार अकरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांंंना आर्यनच्या गोळ्या देणे हा उपक्रम राबविण्यात येतो. आयर्नच्या गोळ्यामुळे साईड इफेक्टबाबत शाळांकडून तक्रारी अद्याप प्राप्त झाल्यास निश्‍चितच कार्यवाही करू, असे शिक्षणविभागाचे म्हणणे आहे. आर्यनची कमतरता प्रत्येकच विद्यार्थ्यांंंमध्ये असते असे नाही. त्यामुळे आवश्यक त्या विद्यार्थ्यांंंलाच आर्यनच्या गोळ्या देण्यात याव्या, यासाठी विद्यार्थ्यांंंची वैद्यकीय तपासणी करावी, त्यासाठी पालकांची मंजुरी घेणेही अनिवार्य करावे, पालकांना विश्‍वासात न घेता शासनाने परस्पर आयर्नच्या गोळ्या विद्यार्थ्यांंंना देण्याचा शासनाचा निर्णय अयोग्य आहे. याला विरोध पालक म्हणून करणारच. सर्वच विद्यार्थ्यांंंना गोळ्या देणे चुकीचे आहे, असे शिक्षक म्हणतात.(तालुका प्रतिनिधी)