शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य मार्गावरील खड्डे पुन्हा किती बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:48 IST

शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतआमगाव : शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतसुध्दा वाढ झाली असून आत्तापर्यंत सात ते आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे पुन्हा किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल केला जात आहे.आमगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिक आमगाव येथे येतात. त्यामुळे येथे सतत वर्दळ असते. आमगाव राज्य मार्गावर वाहनांची सुध्दा दिवसभर वर्दळ असते. आमगाव ते सालेकसा राज्य मार्ग, कामठा, गोंदिया, देवरी व शहरातील नटराज मार्ग ते गुरुदेव चौक मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यांवरील एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे, डांबरीकरण रस्त्यांवरील उखडलेल्या खड्ड्यांमधील बोल्डर, गिट्टी यामुळे वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मागील महिनाभराच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चार जणांना जीव गमवावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केलेले नाही.शहरातील आंबेडकर चौक, शेंडे मार्केट मार्ग, नटराज मार्ग, कामठा चौक या मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. परंतु आमगाव शहर व सीमा राज्य मार्ग अद्यापही विकास कामांपासून वंचित आहेत. त्यासाठी संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.जखमींना वेळेवर मदतीचा हात द्यामार्गावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहन चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मार्गावर अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करावे. जखमींच्या मदतीसाठी नागरिकांनी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी युवा शक्ती फाऊंडेशनच्या गुणीराज पटले, सुशीला शिव यांनी केली आहे.