शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:06 IST

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते.

ठळक मुद्देप्रशासनच अनभिज्ञ : १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला याची माहिती जिल्हा प्रशासनाकडेच नसून प्रशासनच यापासून अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.केंद्र सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. तसेच एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची लगईघाई केली. एवढेच नव्हे तर प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करुन फोटो काढण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला दिवसरात्र जुपंण्यात आले. पण त्यानंतर या योजनेतंर्गत किती शेतकºयांना याचा लाभ मिळाला याची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८५ हजार खातेदार शेतकरी आहे. यापैकी १ लाख ३५ हजार ७८५ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्यामुळे एवढेच शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेस पात्र ठरले होते. महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेने पात्र शेतकºयांची यादी शासनाच्या एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली.त्यानंतर ३ हजार ४०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात येईल, असा संदेश सुध्दा या विभागाला प्राप्त झाला. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत या योजनेतंर्गत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला याची कुठलीही माहिती या दोन्ही विभागाकडे उपलब्ध नसल्याचे या विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील किती शेतकºयांना मिळाला यापासून स्वत: जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.पैसे जमा करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाला नाहीमहसूल आणि कृषी विभागाने दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची संपूर्ण माहिती एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यानंतर शासनाने किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा केला याची यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. मात्र तसे करणे टाळले जात असल्याने जिल्हा प्रशासनाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.महसूल व कृषी विभाग याद्या तयार करण्यापुरताचप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी शासनाने या दोन्ही विभागाच्या अधिकाºयांना दिवसरात्र राबवून घेतले. मात्र यानंतर त्यांना किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला याची सुध्दा माहिती उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे या विभागाचे काम केवळ याद्या तयार करण्यापुरतेच असल्याचे दिसून येते.आचारसंहितेमुळे काम थंडबस्त्यातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आचारसंहिता लागण्यापूर्वी पहिला हप्ता जमा करण्यासाठी लगीनघाई सुरू होती. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने सध्या हे काम थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे.हजारो शेतकरी संभ्रमातप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ८७५ शेतकरी पात्र ठरले. मात्र अद्यापही त्यांना पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा होण्याच्या संदेश आला नाही. त्यामुळे हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा होणार की अशा संभ्रमात शेतकरी आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती