शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

हिरवी मिरची झोंबू लागली, 80 रूपयांवर भाव कसा परवडेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता संपत आल्याने त्यांचे दर वधारले आहे. किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आजघडीला प्रत्येकच वस्तूचे दर वधारले असून सर्वसामान्यांना आता बाजारात जाणे म्हणताच धडकी भरू लागते. रशिया व युक्रेनमधील युद्धाचे पडसाद आता उमटू लागले असून खाद्यतेलाचे भाव वधारल्यानंतर आता किराणामालही वधारत चालला आहे. यात भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता संपत आल्याने त्यांचे दर वधारले आहे. किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे. अशात मात्र सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा ही एकच मागणी जनता करीत आहे. 

पालेभाजीही महागली हिवाळा म्हणजे पालेभाज्यांचा काळ असतो मात्र आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यो पालेभाज्यांचा काळ संपला आहे. परिणामी पालेभाज्यांची बाजारात आवक कमी झाली आहे. म्हणूनच आता पालेभाज्या चांगल्याच महागल्या आहेत. 

शेतकऱ्यांचे गणित बसेना 

भाजीपाला लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. शिवाय मजुरीही जास्त लागत असल्याने शेतकरी साधारणत: भाजीपाला लागवड करीत नाही. त्यातल्या त्यात वातावरणात बदल झाल्यास रोगराईमुळे सर्व मेहनत वाया जाते. म्हणूनच भाजीपाला लागवड परवडत नाही. - मंसाराम चिखलोंडे 

यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. भाजीपाला लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मात्र तेवढीच मेहनत असून रोगराई आल्यास हाती काहीच येत नाही. यामुळेच भाजीपाला लागवड करणे धोक्याचे असून परवडणारे ठरत नाही. - निहारीलाल दमाहे 

ग्राहकांनाही परवडेना भाजीपाला

खाद्य तेल व किराणामालाचे दर अवाढव्य वाढले असून सर्वसामान्यांना परवडणारे राहिलेले नाही. त्यात आता भाजीपाला वधारल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. - देवा शेंडे 

आता उन्हाळा लागल्याने हिरवा भाजीपाला मिळणार नाही. यामुळेच आवक कमी झाली असून त्यांचे दर वदारले आहे. शिवाय सर्वच भाजीपाला महागला आहे. सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. - महेंद्र तिडके 

 

टॅग्स :vegetableभाज्या