शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चालकच नसल्याने बसेस धावणार तरी कशा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात एकही चालक कामावर नसल्याने बस चालविणाराच कुणी नसून बसेस आगारातच उभ्या आहेत. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने पूर्ण झाले आहेत. जोपर्यंत महामंडळाचे शासनात विलीनीकरण नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा कर्मचाऱ्यांचा पवित्रा असून ते निर्णयावर ठाम आहेत. यामुळे अवघ्या राज्यात एसटी आगारात उभी असून संप सुटण्याची वाट बघितली जात आहे. मात्र ‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. मात्र शासनाच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर काही कर्मचारी कामावर परतत असल्याने काही जिल्ह्यांतील फेऱ्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात एकही चालक कामावर नसल्याने बस चालविणाराच कुणी नसून बसेस आगारातच उभ्या आहेत. संप सुरू झाल्यापासून दोन्ही आगारातून एकही भस रस्त्यावर आलेली नाही. दोन्ही आगारात चालक कामावर नसल्याने बसेस धावणार तरी कशा ? असा प्रश्न येथे पडतो. 

गोंदिया- भंडारा मार्गावर बसेस सुरू - जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातील एकही चालक कामावर नसल्याने सर्वच बसेस बंद आहेत. यामुळे भंडारा आगारातून बसेस येथे पाठविल्या जात आहेत. भंडारा येथील बसेस तिरोडा मार्गाने प्रवासी नेत असल्याची माहिती आहे. मात्र गोंदिया व तिरोडा आगारातील एकही बस फेरी मारत नाही. 

सर्वच बसेस आगारात उभ्या - चालक नसल्याने बसेस चालविणारा कुणीही नसून बसेस उभ्या आहेत. अशात भंडारा आगारातील बस तिरोडा होत गोंदिया फेरी मारत आहे. मात्र जिल्ह्यातील अन्य सर्वच मार्गांवरील फेऱ्या बंद आहेत. चालक जोपर्यंत कामावर येत नाही तोपर्यंत अन्य मार्गावरील फेऱ्या सुरू होणार नाही. 

चालक नसल्याने बस चालविणार कोण?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता २ महिने पूर्ण झाले आहेत. एसटी नसल्यामुळे आम्हाला अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. मात्र ते परवडणारे व सुरक्षित नाही. अशात आता एसटीचा संप मागे झाला पाहिजे व एसटी परत सुरू झाली पाहिजे. -प्रल्हाद महंत 

सुरक्षित प्रवासासाठी एसटीवर सर्वांचा विश्वास आहे. मात्र २ महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेल्याने बसेस बंद असून प्रवाशांची अडचण होत आहे. पर्याय नसल्याने आम्हाला अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. आता एसटी सुरू होण्याची गरज आहे. - मुकेश गणवीर 

चालक कामावर नाहीत आगारातील एकही चालक कामावर परतून आले नसून ते संपात सहभागी आहेत. अशात बस चालविणारेच नसल्याने बसेस आगारात उभ्या आहेत. सध्या एकही फेरी सुरू झालेली नाही.       -संजना पटले,आगारप्रमुख, गोंदिया

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप