शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या निधीतून घरकूल कसे बांधावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 20:56 IST

स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांनाच वाटते. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून घरकूल योजना राबविते. मात्र लाभार्थ्यांना मिळणारा निधीच तुटपुंजा असल्यामुळे त्यातून घरकूल बांधावे तरी कसे? अशी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची दिरंगाई : लाभार्थी सावकाराच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : स्वत:चे हक्काचे घर असावे, असे सर्वांनाच वाटते. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून घरकूल योजना राबविते. मात्र लाभार्थ्यांना मिळणारा निधीच तुटपुंजा असल्यामुळे त्यातून घरकूल बांधावे तरी कसे? अशी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झाली आहे.हक्काचे घर असावे, असे सर्वांचेच स्वप्न असते. पण गगणाला भिडणाऱ्या महागाईमुळे व घर बांधकाम करण्याची सर्वांचीच ऐपत नसल्यामुळे स्वत:च्या घराचे स्वप्न अपूर्णच राहते. सध्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाºया नागरिकांसाठी शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना, शबरी घरकूल योजना राबविली जात आहे. मात्र घरकूल बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात देण्यात येणाºया तुटपुंज्या अनुदानामुळे स्वत:चे घर बांधताना लाभार्थ्यांना सावकाराचा शोध घ्यावा लागत असून कर्जबाजारीच व्हावे लागत आहे.दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अर्थ सहाय्याने पंचायत समिती स्तरावर प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना राबविली जात आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत शबरी घरकूल योजना राबविली जात आहे. मात्र घरकूल बांधकामासाठी देण्यात येणारा प्रथम टप्प्याचा अनुदान फारच अपुरे पडत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वेगळे कर्ज घेवून बांधकामाच्या साहित्यांची जमवाजमव करणे भाग पडत आहे. अशातच संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीमुळे या योजना कुचकामी ठरत आहेत.घराचे छप्पर स्लॅब करावे लागते. घरकूल मंजुरीसाठी लाभार्थ्यांना गोळा करावी लागणारी कागदपत्रे, नंतर ये-जा करण्यामध्ये साहेबांजी जी-हुजूरी करण्याचा खर्चही आठ हजारांच्या वर होते. त्यातच गरजेच्या वेळीच अनुदान मिळत नाही. शासनाने या सर्व बाबींचा विचार करून घरकुलासाठी असलेले अनुदान वाढवून तीन लाखांपर्यंत करणे काळाची गरज आहे व तशी लाभार्थ्यांची मागणीसुद्धा आहे.बांधकामाचे दर महागलेघर बांधकामाच्या साहित्याचे दर महागले आहेत. सिमेंट, रेती, विटा, बेलदार, मजूर आदींचा खर्च परवडण्याजोगा राहिला नाही. किमान ८०० रूपये चौरस फूट असा खर्च बांधकामासाठी धरला तर सामान्य माणसांचे बजेट कोलमडून जाते. २६६ चटई क्षेत्राचे घरकूल उभे केले तर हा खर्च पाच लाखांपर्यंत जातो. मात्र यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान फार कमी पडत आहे.प्रथम टप्प्यात केवळ ३० हजारप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३० हजार रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांसाठी ठरविण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात केवळ ३० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. तर दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना अनुदान देण्याची कालमर्यादा निश्चित नाही. त्यामुळे सावकारांकडून अधिक टक्केवारीने व्याजावर कर्जाची उचल करावी लागत आहे.लाभार्थ्यांसमोर पेच, बांधकाम अर्धवटप्रधानमंत्री आवास योजना लोककल्याणासाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र या योजनेंतर्गत बांधकाम पूर्ण करण्याची ठराविक कालमर्यादा घालण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर पेच निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक बांधकाम अपूर्णच आहेत. काही बांधकाम पूर्णत: ठप्प पडले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना वाढली आहे.