शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

किंडगीपार रेल्वे उड्डाणपुलाचे घोडे अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 9:10 PM

जिल्ह्यातील रस्ते वाहतूक गतिमान असताना जलद रस्ते मार्गांना रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा निर्माण होत आहे. किंडगीपार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या मागणीसह अनेक ठिकाणी असलेल्या क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.

ठळक मुद्देवाहतुकीला रेल्वे क्रॉसिंग गेटचा अडथळा : राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : जिल्ह्यातील रस्ते वाहतूक गतिमान असताना जलद रस्ते मार्गांना रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा निर्माण होत आहे. किंडगीपार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या मागणीसह अनेक ठिकाणी असलेल्या क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून अद्यापही त्यावर कुठलाच विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रस्तावाची फाईल धूळ खात पडली आहे.आमगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भाग रेल्वे मार्गाने जोडला आहे. या रेल्वे मार्गावर गतिमान असलेली वाहतूक मात्र क्रॉसिंग गेटच्या नियमित थांब्यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. आमगाव देवरी मार्गावरील बाम्हणी गेट, किंडगीपार गेट, जवरी मार्ग यावर रेल्वे महमार्गाचे जाळे पसरले आहे. दररोज रेल्वे मार्गात प्रवासी वाहतुकीसह औद्योगिक माल वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे रेल्वे मार्ग अतिव्यस्ततेचे झाले आहे. यात राष्ट्रीय रस्ते महामार्गावरील वाहतुकीला मात्र थांबा मिळत आहे. राष्ट्रीय रस्ते महामार्गावर असलेल्या रेल्वे मार्गाची रेल्वे क्रॉसिंग वाहतुकीला डोकेदुखी ठरत आहे. आमगाव येथे बाजारपेठ आहे. शहराला जोडणारा रस्ते महामार्ग मध्यप्रदेश व छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा केंद्र बिंदू आहे. औद्योगिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळविण्यासाठी या महामार्गाचा अवलंब केला जातो. परंतु प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी रस्ते महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा ठरत आहे. रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक असल्याने वारंवार रेल्वे क्रॉसिंगवरील गेट बंद होते. किमान २५ ते ३० मिनिटापर्यंत या मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प होते. रेल्वे मार्गावरील क्रॉसिंगमुळे रस्ते मार्गावरील औद्योगिक, प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.रस्ते महामार्गावर रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा कायम सुटावा यासाठी उड्डाणपुलाची मागणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली. मात्र या प्रस्तावाला राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाची मंजुरी न मिळाल्याने ब्रेक लागल्याची माहिती आहे.रेल्वेचा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडेशहरातील बाम्हणी व किंडगीपार रस्ते महामार्गावरील रेल्वे वाहतुक क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आला आहे. रेल्वे विभागाने प्राधान्यक्रमाने उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखविला आहे. याला राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजुरी देऊन वाहतूक गतिमान करावी, असे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रस्तावावर अनेकदा चर्चारेल्वे उड्डाणपुलासह प्रवासी वाहतूक गाड्या आमगाव-डोंगरगड-गोंदिया या मार्गावर उपलब्ध व्हावी. यासाठी रेल्वे विभागाकडे पत्र व्यवहार सुरु आहे. अनेकदा रेल्वे विभागातील बैठकांमध्ये यासंबंधिचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. नागपूर रेल्वे विभागाने प्रस्ताव केंद्रीय रेल्वे विभागाला सादर केले आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल, अशी आशा डीआरयुसीटी सदस्य घनशाम अग्रवाल यांनी व्यक्त केली.तीन टप्प्यात होणार कामआमगाव येथील रस्ते मार्गावरील बाम्हणी व किंडगीपार रेल्वे उड्डाणपुलाच्या मागणीचा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाला सादर करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्यातील देवरी-आमगाव रस्ते मार्गाचे बांधकामाला मंजुरी मिळून कार्य प्रगतीवर आहे. यात बाम्हणी रेल्वे क्रॉसिंग गेट वरील उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील आमगाव-गोंदिया बायपास रस्ते मार्ग बांधकामाचा प्रस्ताव मंजुरीकरिता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :railwayरेल्वे