सावन बहेकार हे गेल्या १५ वर्षांपासून वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी कार्य करीत आहेत. संकटग्रस्त असलेल्या सारस पक्षी संवर्धनासाठी स्थानिक लोक व स्वयंसेवी युवकांना सोबत घेऊन सारस संरक्षणासाठी लोकचळवळ उभी केली. याचेच फलित संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यातच आढळणारे सारसांची संख्या आज ४५ इतकी झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यात सारस संरक्षणासाठी २०१४ पासून कार्य करीत आहे. नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पात व प्रकल्पालगत टायगर पाॅप्युलेशन ईस्टीमेशन, कॅमेरा ट्रॅप सेंसस व माॅनिटरिंगमध्ये विशेष कार्य केले आहे. तलाव, पाणथळ पक्षी अधिवास वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न, जैवविविधतेचे अभ्यास करून त्याचे लाॅंग टर्म कंजर्वेशन प्लॅन तयार करणे, माळरान संवर्धनासाठी व व्यवस्थापनाच, काळवीट आणि लांडग्यांच्या संरक्षणासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. सन २०१२ ते २०१७ दरम्यान गोंदिया जिल्हा मानद वन्यजीव रक्षक, सध्या जिल्हा व्याघ्रकक्ष समिती, जिल्हा जैवविविधता समिती, जिल्हा पर्यटन विकास समिती, ॲनिमल वेल्फेअर बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांना मानद वन्यजीव रक्षक पद पुन्हा बहाल करण्यात आले आहे.
सावन बहेकार यांना मानद वन्यजीव रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST