शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा अधिकाधिक वापर हाच मातृभाषेचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:26 IST

महाराष्ट्रात आपण बोलण्यात व लिहिण्यात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावयास पाहिजे. मराठी ही दर्जेदार भाषा असून शब्दांचा खजीना अफाट आहे.

ठळक मुद्देभास्कर गायकवाड : आगारात मराठी भाषा गौरव दिन साजरा

ऑनलाईन लोकमततिरोडा : महाराष्ट्रात आपण बोलण्यात व लिहिण्यात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावयास पाहिजे. मराठी ही दर्जेदार भाषा असून शब्दांचा खजीना अफाट आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अधिकाधिक वापर हाच मातृभाषेचा सन्मान असल्याचे प्रतिपादन प्रा.भास्कर गायकवाड यांनी व्यक्त केले.येथील बस आगारात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आभार व्यवस्थापक के.सी.चोपकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नितिन आगाशे, निळकंठ साकुरे, रमाकांत खोब्रागडे उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. गायकवाड यांनी, देशाच्या इतर राज्यातील लोकांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान आहे. ते आपल्या बोलण्यात कन्नड, तामिळी, पंजाबी, हरयाणवी, आसामी, बंगाली आदी भाषांचा वापर करतात. त्या राज्याची शासकीय व्यवहाराची भाषा देखील तेथील मातृभाषाच असते. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी बोलणारे सुद्धा हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर अधिक करताना दिसतात. संत ज्ञानेश्वरांपासून अनेक मोठमोठ्या साहित्यीकांनी मराठी भाषा फुलवली आहे. आपल्या मातृभाषेचा वापर आपल्या व्यवहारात व बोलण्यात अधिकाधिक करावा असे आवाहन केले.याप्रसंगी चोपकर यांनी, महाराष्ट्रातील इतर शासकीय कार्यालयांचा व्यवहार प्रामुख्याने इंग्रजीत चालतो. मात्र केवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळ असे आहे की, येथे फक्त मराठीतूनच व्यवहार केला जातो. अस सांगीतले.कार्यक्रमाला बसस्थानक प्रमुख टेकाम, दिलीप बंसोड, अमित उरकुडे, सातके पटले उपस्थित होते. संचालन बडोले यांनी केले. आभार आगाशे यांनी मानले.

टॅग्स :Marathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2018