शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

वणव्यामुळे घर खाक

By admin | Updated: March 20, 2016 02:13 IST

मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

देवरी : मोहाफुल वेचण्याकरीता ग्रामस्थांकडून जंगलात लावण्यात आलेल्या आगीचा वणवा गावापर्यंत पसरल्याने दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात एका शेतकऱ्याचे घर जळून पूर्णपणे राख झाल्याची घटना शनिवारला दु.१ वाजता मल्हारबोडी गावात घडली. देवरीपासून ५ किमी अंतरावर असलेले मल्हारबोडी हे गाव १५ ते २० घरांचे आहे. गावातील महिला पुरूष मग्रारोहयोच्या कामावर गेले होते. काही लोकांनी मोहफुल वेचण्याकरीता जंगलाला आग लावल्यामुळे ती आग गावापर्यंत पोहोचली. या आगीमुळे गावातील वाड्या, तणसाचे ढिगारे, शेतातील सिंचनाचे पाईप व एका शेतकऱ्यांचे मकान पूर्णत: जळून राख झाले. घर जळालेल्या शेतकऱ्यांचे नाव मोतीनाथ काशीनाथ ठाकरे (६६) असे आहे. ते एकटेच आपल्या घरात राहात होते. याप्रसंगी ते घरात झोपलेले होते. गावात कोणीच ग्रामस्थ नसल्याने आग विझविता न आल्याने मोतीनाथ ठाकरे यांचे घर राख झाले. या शेतकऱ्याच्या घराला लागून असलेले लक्ष्मण दागो प्रधान (६०) यांच्या घराबाहेर ठेवलेले सिंचन पाईप पूर्णपणे जळाले. तसेच तणसाचे ढिगारे पूर्णपणे जळाले. घटनेची बातमी कळताच देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक यांनी देवरी व चिचेवाड्यावरुन पाण्याचा टॅकरची व्यवस्था करून आग आटोक्यात आणली. दोन्ही शेतकऱ्यांना सांत्वना देत सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले. या वणव्यामुळे मल्हारबोडी गावातील लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरीत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)