शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:48 IST

देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकण माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होतो.

ठळक मुद्देढिसाळ नियोजनाचा फटका : १४ तासात २० प्रवासी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया येथे देवरी-आमगाव मार्गे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम नियोजन शून्य होत आहे. या मार्गावर एक किमी अंतरात अवघ्या १४ तासात २० जण जखमी झाले आहेत. याकडे सदर यंत्रणेने दुर्लक्ष केल्यास या ठिकाणी प्राणांतीक अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.देवरीपासून आमगाव मार्गे या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. पदमपूरच्या पोवारीटोला ते आमगावच्या नाबार्ड बोर्डपर्यंत या रस्त्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ता तयार करतांना एका बाजूचा रस्ता तयार करून दुसºया बाजूने प्रवाश्यांना सहजरित्या प्रवास करता येईल, अशी सोय करायला हवी होती. परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून टाकला. वाटसरूंना जाण्या-येण्यासाठी मुरूम व माती टाकण्यात आली. परंतु मुरूमामध्येही चिकण माती मिश्रीत असल्यामुळे पाण्याने मुरूम ओले होऊन त्यावरून वाहने गेल्यास वाहने घसरतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होतो. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता पाऊस आल्याने आमगावच्या नाबार्ड बोर्डपासून धम्मगीरी या एक किमीच्या अंतरावर सायंकाळी ७ वाजता पासून १ जानेवारी २०२० च्या सकाळी ९ वाजता या १४ तासाच्या आत २० पेक्षा अधिक जण पडले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.चिखलातून मार्गक्रमण करावा लागत असतांना वाहने घरून त्यावरून चालक व मागे बसलेले लोक पडतात. या मार्गावरून जातांना सर्वात जास्त अपघात मोटारसायकल चालकांचा होत आहे. चिकण माती मिश्रीत मुरूम टाकल्यामुळे दुचाकी सहज घसरते. परिणामी अपघात होतात. या महामार्गाचे बांधकाम करतांना वाटसरूंची येण्या-जाण्याचा रस्ता सोयीस्कर करूनच बांधकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे होत नसल्याने अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागते. याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नाहीत. या रस्त्यावर रात्रीपासून सकाळपर्यंत झालेल्या अपघातामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे.अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलीया महामार्गाचे बांधकाम करतांना बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची मोठी पाईप लाईन अनेकदा फुटली. बांधकाम करतांना जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करण्यात येत असल्यामुळे जेसीबीने पाईप फुटले आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणचा पाणी पुरवठा बंद असतो. मुख्य पाईप लाईन फुटली की सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद होतो. पाईप फुटल्यानंतर हा महामार्ग बणविणारे पाईपची दुरूस्ती करून देतात. परंतु मागील वर्षभरापासून दोन-चार दिवसात पाईप फुटण्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.

२५ हजार ब्रास मुरुमाची मंजुरी पण वापरले किती?राष्ट्रीय महार्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २५ हजार ब्रास मुरूम तालावातून काढण्याची मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या रस्त्यावर वापरण्यात येणारे मुरूम तलावातील नाही. तलाव खोलीकरण करून त्यातील मुरूम या ठिकाणी वापरण्यात यावे अश्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना होत्या. परंतु तसे न करता भलत्याच ठिकाणी खोदकाम करून मुरूमाचा वापर केला जात आहे. २५ हजार ब्रास मुरूम वापरण्याची मंजुरी देण्यात आली. परंतु या ठिकाणी वापरण्यात आलेले मुरूम लाखो ब्रासच्या घरात आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी महोदय, मुरुमाची चौकशी कराचदेवरी ते आमगाव मार्गे तयार होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी वापरण्यात आलेले मुरूम कुठून काढण्यात आले. किती ब्रास मुरूम काढण्यात आले याची सर्व चौकशी जिल्हाधिकारी यांनी केल्यास किती मुरूम अधिक काढण्यात आले ही बाब पुढे येईल. या बांधकामाच्या नावाने अनेक अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्यामुळे कुणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा