शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालकांना हेल्मेटची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:38 IST

जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.

ठळक मुद्देपोलिसांपासून सुरूवात : १५ आॅक्टोबरपासून सक्ती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात येणार आहे.अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, वडील, आई यांच्यावर आर्थिक, शारीरिक व मानसिक संकट येते. दरवर्षी रस्ता अपघातात सामान्य जनतेसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मृत्यू पावतात. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त दुचाकी चालक असतात. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबावर संकट कोसळते.हीच बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती महिनाभरापूर्वीपासून करण्यात आली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे ९ पोलिसांना दंड करण्यात आला. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर केलेला नाही, अश्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सवय लागावी, यासंदर्भात १३ सप्टेंबरला विशेष मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया शहरात राबविलेल्या मोहीमेत ९ पोलीस कर्मचारी वाहन चालविताना हेल्मेट वापरलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर मोटार वाहन काद्यान्वये प्रत्येक व्यक्तीवर ५०० रूपये प्रमाणे ४५०० रूपये तडजोड शुल्क त्यांच्याकडून वसूल करण्यात आला.आता सर्वसामान्य वाहन चालकांना व त्या वाहनावर मागे बसलेल्या लोकांनाही हेल्मेटचा वापर न केल्यास त्यांच्यावरही मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. दंड म्हणून ५०० रूपये आकारण्यात येणार आहे. वाहन चालकांना सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून हेल्मेट वापरावेच लागते. परंतु बहुतांश वाहन चालक हेल्मेटला सांभाळण्याची कटकट समजून हेल्मेट वापरत नाही. त्यांना आता मोटार वाहन कायद्यान्वये दंड भरावा लागणार आहे.मोटारसायकल चालकांनी व मागे बसणाऱ्या व्यक्तींनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेट वापरावेत. हेल्मेट न वापरणाºयांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.- संजय सिंह,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

टॅग्स :Policeपोलिस