लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरासह जिल्ह्यातील इतर भागात सोमवारी (दि.२३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही दुकानांचे छत उडाले तर तब्बल अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. गोंदियासह सालेकसा, आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सुध्दा पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सोमवारपासून तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. काही क्षणातच गारपीट सुरूवात झाली. जवळपास अर्धा तास पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर गारपीटीमुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली होती. सडक अर्जुनी तालुक्यात सुध्दा पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे गहू, हरभरा या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. आमगाव, गोरेगाव, सालेकसा आणि तिरोडा या परिसरात सुध्दा सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गारपीट आणि पावसाला सुरूवात झाली. या भागात जवळपास अर्धा तास पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द, धापेवाडा या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.वृत्त लिहीपर्यंत भागातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.गारपीटीमुळे कौलारुंच्या घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. यंदा रब्बी हंगामात १५ हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली असून गारपीट आणि पावसाचा सर्वाधिक फटका या दोन पिकांना बसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुन्हा दोन दिवस पावसाचा इशाराहवामान विभागाने जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुन्हा वादळी वाºयासह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रब्बी उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.केंद्रावरील धान भिजलेसध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर जवळपास पाच लाख क्विंटल धान उघड्यावर पडला असून सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावरील धान भिजल्याची माहिती आहे.नगर परिषदेची पोलखोलसोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाल्या चोक होऊन रस्त्यांवरुन पाणी वाहत होते. यामुळे नगर परिषदेच्या कारभाराची सुध्दा पोलखोल झाली.
गारपीटीसह जोरदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:01 IST
शहरासह जिल्ह्यातील इतर भागात सोमवारी (दि.२३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही दुकानांचे छत उडाले तर तब्बल अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. गोंदियासह सालेकसा, आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सुध्दा पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गारपीटीसह जोरदार पावसाची हजेरी
ठळक मुद्देशहरातील रस्त्यांवर साचले पाणी : रबी पिकांचे नुकसान, उघड्यावरील धानाला फटका