शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने नदी- नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर धरणाच्या पाणी पातळीही वाढ झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ  झाल्याने शुक्रवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता या धरणाचे सहा दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पाऊस झाला असून, गोंदिया आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने पावसाची ३० ते ४० टक्के तूट निर्माण झाली होती. त्यामुळे पुढे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. टाकलेले पऱ्हेदेखील वाळण्याच्या मार्गावर आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार  हजेरी लावल्याने जून महिन्यात पडलेली पावसाची तूट भरून निघाली असून, सरासरीच्या १४१ टक्के पाऊस झाला आहे.  त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने नदी, नाले, तलाव व सिंचन प्रकल्प भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहे. खरीप हंगामाची चिंतादेखील काही प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५२.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, अर्जुनी मोरगाव आणि गोंदिया तालुक्यात  अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातसुध्दा पावसाचा जोर कायम असल्याने सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला  धरणाचे ७ दरवाजे शुक्रवारी सकाळी उघडण्यात आले. 

सरासरीच्या १४१.१ टक्के पाऊस - जिल्ह्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत ३९३.६ मिमी पाऊस पडतो. तर प्रत्यक्षात या कालावधीत आतापर्यंत ५५५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, त्याची सरासरी १४१.१ टक्के आहे. तर मान्सून कालावधीत ४५.३ टक्के पाऊस झाला आहे. 

त्या ९६ गावांना सतर्कतेचा इशारा पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शुक्रवारी पुजारीटोला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कालीसरार धरणाचेही दरवाजे उघडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठालगत असलेल्या ९६ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. गोरेगाव, तिरोडा आणि गोंदिया तालुक्यातील १०० हेक्टरमधील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेल्याने त्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.  

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर