शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेचे धिंडवडे

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून

यशवंत मानकर - आमगावआरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील नागरिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहात आहेत. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत असून २०० रुग्णांच्या उपचाराचा भार केवळ एका डॉक्टरवर आल्याने उपचार कुणाचा करावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तू अद्यावत आहेत. परंतु नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा डॉक्टर व कर्मचाऱ्यांअभावी सलाईनवर येऊन पडली आहे. तालुक्यातील ठाणा, कालीमाटी, अंजोरा, घाटटेमनी, तिगाव, बनगाव तसेच आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी उसळत आहे. परंतु सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेण्यासाठी जातात व आर्थिक तडजोड करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत.तिगाव आरोग्य केंद्रावर नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांचे ‘आॅल इज वेल’ आहे. डॉक्टर व सुविधांच्या अभावामुळे रुग्ण उपचारासाठी दुसरीकडे वळत आहेत. प्रसुत मातांना तातडीची सेवा देण्यासाठी रुग्णालय खटारा वाहनावर अवलंबून आहे. औषधांचा तुटवडा नेहमीचाच प्रश्न आहे. तालुक्यातील मुख्य केंद्र आमगाव येथे ग्रामीण रुग्णालयात तांत्रिक सुविधा व स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष आहे. रुग्णालयात दररोज ३०० रुग्ण आरोग्य तपासणीसाठी दाखल होतात. परंतु उपचार देणारे डॉक्टर व कर्मचारी पुरेसे नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. हृषीकेश शंभरकर यांनी सदर विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. तसेच रिक्त पदांच्या मागणीकडे लक्ष वेधले. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे येथील आरोग्यसेवा अद्यावत झाली नाही. येथे दैनंदिन सेवा देण्यासाठी डॉ. शंभरकर व सहकाऱ्यांना तारेवरची कसरत करून ३०० रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागते. या कर्मचाऱ्यांचा वसाहतींची समस्यासुद्धा आवासून उभी आहे. त्यामुळे कर्मचारी निवास व्यवस्थेपासून वंचित आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक उपचार केंद्र व उपकेंद्र आरोग्य सेवा देत आहेत. परंतु योग्य उपचार व सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण परिसरातील रुग्ण आमगाव येथील बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा घेण्यासाठी गर्दी करतात. रुग्णसेवेचा आदर्श निर्माण करणारे बनगाव प्राथमिक उपचार केंद्र रुग्णांना उपचार देण्यासाठी तत्पर असले तरी दैनंदिन २०० रुग्णांना उपचार देण्यासाठी असमर्थ ठरत आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु यापैकी डॉ. अविनाश येळणे उच्च शिक्षणासाठी रजेवर गेल्याने विभागाने दुसऱ्या डॉक्टरची सोय उपलब्ध करुन दिली नाही. आरोग्य सेवकांची दोन पदे रिक्त आहेत. आरोग्य तपासणीत प्रयोगशाळेचे महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु तंत्रज्ञांची पदेही रिक्त असल्याने विविध तपासणी कंत्राटी पद्धतीवरील सहायक व्यक्तीवर अवलंबून आहे. येथे तांत्रिक सुविधांचा अभाव असूनही रुग्णसेवा सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे . रुग्णांच्या कक्षात व परिसरात औषधांचा घनकचरा पडून आहे. गाद्या स्वच्छ नसल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या ३० खाटांच्या रुग्णालयात स्वच्छतेची नितांत गरज आहे. तालुक्यात आरोग्यसेवा देणारी यंत्रणा स्वत:च्या विभागातील मिळणाऱ्या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न पुढे आहे. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना खासगी रुग्णालयाकडे वळावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागते.