शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

आरोग्य विभाग झाला पांगळा

By admin | Updated: December 18, 2014 01:19 IST

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मंजूर असताना ती अद्याप भरण्यात आलेली नाहीत.

देवानंद शहारे गोंदियाजिल्ह्याच्या आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मंजूर असताना ती अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांच्या आरोग्य सेवेचा भार तोकड्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडत आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत एकूण ३६३ पदे तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिकारांतर्गत येणाऱ्या भागात १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.जिल्ह्यातील केटीएस, बीजीडब्ल्यू व सर्व ग्रामीण रूग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ९११ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५४८ पदे भरलेली आहेत. विशेष म्हणजे सर्व ग्रामीण रुग्णालयात वर्ग-१ अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद मंजूर आहे. मात्र सर्वच रुग्णालयात ते पद रिक्त आहे.जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग-१ ची १८ मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग-२ ची ४ पदे, वर्ग-३ ची ९० पदे आणि वर्ग-४ ची ७८ पदे रिक्त आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्रांतर्गत वर्ग-१ व वर्ग-२ चे प्रत्येकी एक पद मंजूर असून ते दोन्ही रिक्त आहेत. वर्ग-३ ची ३ आणि वर्ग-४ ची ८ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील एकमेव सरकारी महिला व बाल रूग्णालय असलेल्या बाई गंगाबाई रुणालयात वर्ग-१ ची ५ पैकी २ पदे रिक्त आहेत. वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ४१ पदे रिक्त व वर्ग-४ ची ३० पदे रिक्त आहेत. तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात वर्ग-३ ची ४ पदे रिक्त आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. देवरी ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची २ पदे व वर्ग-४ ची ४ पदे रिक्त आहेत. चिचगड ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची २ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ४ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. नवेगावबांध ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ५ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. सडक/अर्जुनी ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची ५ पदे तर वर्ग-४ ची ४ पदे रिक्त आहेत. सालेकसा ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची ४ पदे व वर्ग-४ ची ४ पदे रिक्त आहेत. आमगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक तर वर्ग-३ चे एक पद रिक्त आहे. रजेगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ५ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. सौंदड ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची १० पदे रिक्त आणि वर्ग-४ ची ६ पदे रिक्त आहेत.ग्रामीण क्षेत्रांतर्गत रिक्त असलेली पदेजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण १०३ पदे रिक्त आहेत. यात वर्ग-१ चे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पद, जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांची दोन पदे व एडीएचएसची (कुष्ठरोग) तीन पदे रिक्त आहेत. वर्ग-२ ची ७१ पदे मंजूर असून ६४ पदे भरली तर सात पदे रिक्त आहेत. वर्ग-२ च्या गट ब मध्ये ५२ पैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य पर्यवेक्षकांची १७ पैकी ४ पदे रिक्त, आरोग्य सहायकांची (पुरूष) ६४ पैकी ३ पदे, आरोग्य सहायक (महिला) ४० पैकी ३ पदे, एमपीडब्ल्यू (पुरूष) १६६ पैकी २९ पदे, एमपीडब्ल्यू (महिला) २८२ पैकी ४४ पदे रिक्त आहेत. तसेच औषध निर्मात्यांची ४५ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त, तथा आशा स्वयंसेविकांची १,००१ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत.