शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवेत हलगर्जीपणा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:20 IST

शासकीय रूग्णालयातील अव्यवस्था व रूग्णांचे होत असलेले हाल याबाबत माहिती मिळताच आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील स्थिती बघता आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे खडसावून सांगितले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : डीन व सीएससह अधिकाऱ्यांना फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय रूग्णालयातील अव्यवस्था व रूग्णांचे होत असलेले हाल याबाबत माहिती मिळताच आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी (दि.१४) येथील केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाचा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील स्थिती बघता आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे खडसावून सांगितले. तसेच अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकीत्सकासमवेत सर्व अधिकाºयांना चांगलेच फटकारले. रूग्णालयांच्या स्थितीत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.केटीएस जिल्हा रूग्णालयात दौरा केला असता आमदार अग्रवाल यांनी, रूग्णालय परिसरातील घाण व पाण्याच्या निकासीला घेऊन अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते यांना फटकारले. पावसळ््यात रूग्णालयात स्वच्छ नसल्यास येथे संक्रमण पसरणार व रूग्णांचा उपचार होण्याऐवजी ते आणखी आजारी पडणार. मोठ-मोठे अधिकारी येथे बसनाताही अव्यवस्था ही गंभीर बाब असल्याचे म्हणत पावसाचे पाणी रूग्णालयात भरत असल्याने डीन व जिल्हा शल्य चिकित्सक यासाठी दोषी असल्याचे सांगितले.याशिवाय, रूग्ण व वृद्धांच्या सोयीसाठी लावण्यात आलेली व मागील वर्षभरापासून बंद पडलेली लिफ्ट बघूनही आमदार अग्रवाल चांगलेच नाराज झाले. शिवाय वॉर्डात रूग्ण जमिनीवर झोपलेले बघून त्यांनी त्वरीत खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी त्यांनी, कधी लिफ्ट, कधी जनरेटर, कधी सिटी स्कॅन तर कधी एक्स-रे व सोनोग्राफी मशीन बंद करून रूग्णांना अडचणीत आणले जाते. शासनाचे कोट्यवधी रूपये यावर खर्च होत असताना संबंधीतांकडून अव्यवस्था करणे गंभीर असल्याचे म्हटले.याप्रसंगी त्यांच्या सोबत कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृ्नथ्वीपालसिंह गुलाटी, शहर महासचिव अपूर्व अग्रवाल, नफीस सिद्धीकी, अजय गौर, व्यंकट पाथरू, बलजीतसिंह बग्गा, शैलेश जायस्वाल, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम यांच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते होते.रूग्ण जमिनीवर दिसता कामा नयेया दौºयात आमदार अग्रवाल यांनी अधिष्ठाता डॉ. रूखमोडे यांच्याकडून रिक्त पदांची माहिती जाणून घेतली. याबाबत लवकरच आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांना रिक्त पदांची सविस्तर यादी देण्याचे निर्देश दिले. मात्र रूग्णालयात एकही रूग्ण जमिनीवर दिसू नये अन्यथा संबंधिताला त्वरीत निलंबित करणार अशा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Healthआरोग्यGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल