लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : रेल्वे प्रशासनाने हलबीटोला रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यासाठी जेसीबी यंत्राने खोदकाम केले. या खोदकामा दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे. दरम्यान लोकमतने या संबधिचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी गुरूवारी (दि.१४) पाईप लाईनची पाहणी करुन कंत्राटदाराला त्वरीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतंर्गत कटंगी मध्यम प्रकल्पातंर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ही रेल्वे पुलाच्या खालून गेली आहे. दरम्यान रेल्वे विभागाने पुलाखाली खोदकाम सुरू केले आहे.या खोदकामात पाणी पुरवठा करणाऱ्या टी पार्इंट फुटल्याने मागील पाच दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. पाच दिवस लोटूनही पाईप दुरूस्तीचे काम कंत्राटदाराने पूर्ण केले नाही.त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गुरूवारी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी पाईप लाईनची पाहणी केली. तसेच कंत्राटदाराला त्वरीत काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले. पाईप लाईन फुटल्याने पाण्यासाठी नागरीकांच्या रांगा नगरपंचायत कार्यालयात लागत आहे.नगरपंचायतने पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. पाईप लाईन दुरूस्ती होवून सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी शहरवासीयांना पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ठप्प पाणी पुरवठ्याची नगराध्यक्षांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 20:52 IST
रेल्वे प्रशासनाने हलबीटोला रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यासाठी जेसीबी यंत्राने खोदकाम केले. या खोदकामा दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मागील पाच दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प आहे.
ठप्प पाणी पुरवठ्याची नगराध्यक्षांनी घेतली दखल
ठळक मुद्देदुरूस्तीचे काम त्वरित पूर्ण करा : पाईपलाईनची केली पाहणी